स्वारगेट-कात्रज मार्ग बंदच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 04:27 PM2018-09-18T16:27:11+5:302018-09-18T16:31:45+5:30

ताफ्यात पुरेशा बस नसल्याने स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग सुरू करू नये, अशी विनंती पुणे महानगर परिवहन महांडळाने (पीएमपी) महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यामुळे नवीन बस आल्याशिवाय हा मार्ग सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Swargate-Katraj route will remain closed | स्वारगेट-कात्रज मार्ग बंदच राहणार

स्वारगेट-कात्रज मार्ग बंदच राहणार

Next
ठळक मुद्देकाही दिवसांपुर्वी सुरू झालेल्या निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर सध्या पीएमपीच्या सर्वाधिक २२७ बससध्या स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाचे काम प्रगतीपथावर

पुणे : ताफ्यात पुरेशा बस नसल्याने स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग सुरू करू नये, अशी विनंती पुणे महानगर परिवहन महांडळाने (पीएमपी) महापालिका आयुक्तांना केली आहे. त्यामुळे नवीन बस आल्याशिवाय हा मार्ग सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.जानेवारी महिन्यात नवीन बस येणार असल्याने तोपर्यंत प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.
काही दिवसांपुर्वी सुरू झालेल्या निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावर सध्या पीएमपीच्या सर्वाधिक २२७ बस सोडाव्या लागत आहेत. या मार्गासह पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सध्या बीआरटीचे पाच मार्ग सुरू आहेत. पीएमपीकडे बीआरटी मार्गांवरून धावण्यायोग्य सर्व बसचे या मार्गांवर संचलन सुरू आहे. तसेच दैनंदिन ब्रेकडाऊनमुळे काहीवेळा हे नियोजनही कोलमडते. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच सध्या स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर हा मार्गही सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत ‘लोकमत’ने दि. २९ आॅगस्ट रोजी ‘स्वारगेट-कात्रज बीआरटी अधांतरी’ या वृत्तातून या मार्गाची स्थिती मांडली होती. त्यावर नुकतेच शिक्कामोर्तब झाले आहे.
पीएमपी प्रशासनाने याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बीआरटी बसच्या कमतरतेबाबत माहिती दिली आहे. स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग सुरू केल्यास संचलनासाठी पुरेशा बस उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा मार्ग सुरू करू नये, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे. त्यासाठी नवीन बसेसची प्रतिक्षा करावी लागणार आहे. सध्या ‘पीएमपी’कडून नवीन ४०० सीएनजी बस घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. अद्याप ही प्रक्रिया प्राथमिक स्तरावर आहे. तसेच १५० ई-बसेसची प्रक्रियाही अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यात नवीन बस येण्यासाठी नवीन वर्ष उजाडावे लागणार आहे. त्यानंतरही नवीन बीआरटी मार्गावर बस संचलन सुरू होऊ शकते, याबाबत पालिका आयुक्तांना सांगण्यात आले आहे. 
------------------
निगडी ते दापोडी मार्ग सुरू झाल्याने उपलब्ध बीआरटी बस या मार्गावर सोडण्यात येत आहेत. नवीन मार्ग सुरू झाल्यास संचलनासाठी पुरेशा बस नाहीत. ४०० सीएनजी बस आल्यानंतर हे शक्य होईल. याबाबत पालिका आयुक्तांना कल्पना देण्यात आली आहे.
- नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Web Title: Swargate-Katraj route will remain closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.