स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:12 IST2025-04-17T18:11:28+5:302025-04-17T18:12:22+5:30

- परगावी जाण्यासाठी स्वारगेट एस.टी. स्थानकात आलेल्या एका तरुणीकडे आरोपी दत्ता गाडे याने स्वत:ला वाहक असल्याची बतावणी केली.

swargate case datta gade Big update in Swargate case! 893-page chargesheet filed in court against accused Datta Gade | स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

- किरण शिंदे 

पुणे : राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या स्वारगेट एस.टी. स्थानक बलात्कार प्रकरणात लेटेस्ट अपडेट समोर आली आहे.  पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात 893 पानांचे दोषारोपपत्र  शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात दाखल केले आहे. 52 दिवसांत खंडणीविरोधी पथकाने हा तपास पूर्ण करत दोषारोपपत्र दाखल केले आहे.  

हा धक्कादायक प्रकार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडला होता. परगावी जाण्यासाठी स्वारगेट एस.टी. स्थानकात आलेल्या एका तरुणीकडे आरोपी दत्ता गाडे याने स्वत:ला वाहक असल्याची बतावणी केली. त्यानंतर तरुणीला एका शिवशाही बसमध्ये नेऊन, दरवाजा बंद करून तिला जीवे मारण्याची धमकी देत दोनदा बलात्कार केला. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपीला अटक केली. मात्र, अद्याप आरोपीचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागलेला नाही, अशी माहिती तपासातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तर आज दोषारोपपत्रात घटनेचा तपशीलवार आढावा, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुरावे समाविष्ट करण्यात आले आहेत. पुढील सुनावणीसाठी आता न्यायालयाकडून तारखेची प्रतीक्षा आहे. या संपूर्ण प्रकरणाने प्रवासी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, एस.टी. स्थानकांतील देखरेख व सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: swargate case datta gade Big update in Swargate case! 893-page chargesheet filed in court against accused Datta Gade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.