शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

संचालकपद रद्द आदेशाला स्थगिती

By admin | Updated: January 16, 2015 01:13 IST

पवना सहकारी बँकेच्या आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव जागेवरील संचालक पदाची निवडणूक लढलेल्या जयनाथ काटे यांच्या निवडीबद्दल आक्षेप घेणारा दावा प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश वाघेरे

पिंपरी : पवना सहकारी बँकेच्या आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव जागेवरील संचालक पदाची निवडणूक लढलेल्या जयनाथ काटे यांच्या निवडीबद्दल आक्षेप घेणारा दावा प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश वाघेरे यांनी पुणे येथील सहकार न्यायालयात दाखल केला होता. काटे यांनी जोडलेला उत्पन्न दाखला आणि त्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न यातील विसंगती वाघेरे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर या दाव्याच्या सुनावणीत न्यायालयाने काटे यांची निवड अवैध असल्याचा आदेश दिला. त्या निर्णयानंतर काटे यांनी मुंबईतील राज्य सहकारी वरिष्ठ स्तर न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सुनावणीत या प्रकरणी स्थगिती आदेश दिला आहे. २७ जानेवारीला या दाव्याची अंतिम सुनावणी होणार आहे. संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक २०१० मध्ये झाली होती. संचालक मंडळात आर्थिक दुर्बल गटासाठी राखीव जागेसाठी काटे आणि वाघेरे निवडणूक रिंगणात होते. काटे यांच्या उत्पन्नाच्या दाखल्याबाबत प्रतिस्पर्धी उमेदवार वाघेरे यांनी आक्षेप घेणारा दावा दाखल केला होता. वाघरे यांच्या अर्जावर पुणे येथील सहकार न्यायालयाने मागील आठवड्यात निकाल दिला. त्यामध्ये काटे यांनी निवड अवैध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ स्तर सहकार न्यायालयात काटे यांनी धाव घेतली. त्या निर्णयास स्थगिती मिळाली आहे. (प्रतिनिधी)