Suresh Kalmadi Death: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 07:33 IST2026-01-06T07:33:02+5:302026-01-06T07:33:58+5:30
Suresh Kalmadi Passes Away: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. दुपारी २ वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. वाचा सविस्तर माहिती.

Suresh Kalmadi Death: पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Suresh Kalmadi Death: पुण्याचे माजी खासदार आणि क्रीडा विश्वातील मोठे नाव असलेले सुरेश कलमाडी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
पाकिस्तानविरोधात दोन युद्धे लढली, स्क्वाड्रन लीडर म्हणून रिटायर झाले; सुरेश कलमाडींचा रणभूमी ते राजकारणापर्यंतचा थक्क करणारा प्रवास
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे शहरातील अनेक दिग्गज राजकीय नेते आणि त्यांचे समर्थक दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहेत.
पायलट ते खासदार: एक संघर्षमय प्रवास
भारतीय हवाई दलात 'पायलट' म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कलमाडींनी पुढे राजकारणात मोठे स्थान मिळवले. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. 'पुणे फेस्टिव्हल' आणि 'पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन'च्या माध्यमातून त्यांनी पुण्याला जागतिक नकाशावर आणले.