सुप्यात रिलायन्स कॅम्प कोला कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:57 IST2025-06-11T13:56:19+5:302025-06-11T13:57:15+5:30

कंपनीचे अॅग्रीमेंट केल्यानंतर कंपनीची टीम तुमच्या गोडाऊनला येऊन व्हिजिट करेल,असे सांगून घातला गंडा

Supya cheated of Rs 4 lakhs in the name of getting Reliance Camp Cola company dealership | सुप्यात रिलायन्स कॅम्प कोला कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक

सुप्यात रिलायन्स कॅम्प कोला कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक

सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील व्यावसायिकाला रिलायन्स कॅम्प कोला कंपनीची डीलरशिप मिळवून देण्याच्या नावाखाली सुमारे चार लाखाला गंडा घातल्याची घटना घडली आहे. वैभव नवनाथ चांदगुडे (रा. खोपवाडी, सुपे, ता. बारामती) यांनी या संदर्भात सायबर पोलिसात तक्रार दिली आहे. मागील महिन्यात वैभव याला एका व्यक्तीचा फोन आला.कॅम्प कोला कंपनीच्या डीलरशिपचे काम द्यायचे आहे. त्यानंतर त्यांनी कंपनीचे अॅग्रीमेंट केल्यानंतर कंपनीची टीम तुमच्या

गोडाऊनला येऊन व्हिजिट करेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे मी अॅग्रीमेंटसाठी तयार होऊन ४९ हजार ५०० रुपये गुगल पे वर पाठविले. तसेच त्यांच्याशी संपर्क करून अॅग्रीमेंट पूर्ण केले असून आपली टीम भेटीसाठी कधी येणार असे बोललो. त्यावेळी त्यांनी मला कोल्ड्रिंकचे अर्धे पेमेंट केल्यानंतर आमची कंपनीची टीम तुमच्या गोडाऊनला भेट देईल, असे सांगितले.

त्यामुळे त्यांनी माझ्याकडून कोल्ड्रिंकची ऑर्डर बिल म्हणून ५ लाख १० हजार रुपये झाले आहेत अर्धी रक्कम भरा, असे सांगितले. तुमचे अर्धे पेमेंट झाल्यानंतर तुमच्याकडे २४ तासांत आमची टीम भेट देईल, असे सांगण्यात आले. बँकेकडून कर्ज काढले. जीएसटीचे १८ टक्के म्हणजे ९० हजार १९० रुपये रक्कम पाठविली. त्यानंतर २ लाख ५० हजार असे मिळून ३ लाख ८९ हजार ६९० एवढी रक्कम पाठविली. त्यावेळी ते भेटायला येतो असे सांगितले, पण आलेच नाहीत. त्यानंतर चौकशी केली असता हे सर्व फ्रॉड असल्याचे लक्षात आले. मात्र, त्यांनी मला सुमारे ४ लाखाला गंडा घातल्याचे लक्षात आले.

Web Title: Supya cheated of Rs 4 lakhs in the name of getting Reliance Camp Cola company dealership