शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्याने बारामतीत पाठिंबा ; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

By अजित घस्ते | Updated: April 29, 2024 16:29 IST

वंचितसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून यावेळी आम्ही आमचे लोकसभेचे खाते नक्की उघडू

पुणे: ‘‘सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्यामुळे आम्ही बारामतीमध्ये उमेदवार दिलेला नाही. शरद पवार हे सध्या बारामतीतच अडकून पडले आहेत. वंचितसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून यावेळी आम्ही आमचे लोकसभेचे खाते नक्की उघडू,’’ असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराची सुरुवात सोमवारी ॲड. आंबेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानिमित्ताने सोमवारी पानमळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर बोलत होते. वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पानमळातून करण्यात आला. 

यापुढे आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशावरील कर्ज वाढले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे पती प्रभाकरण १० दिवसांपुर्वी म्हणाले की, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संपेल. निवडणुका होणार नाहीत. संविधान संपेल. गल्लोगल्ली मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्याबरोबर सध्या लोकसभा निवडणूकीत १२ मतदार संघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात थेट लढत असल्याचे चित्र आहे. त्या मतदार संघात मात्र वंचित फायदा होणार आहे. सेक्युलर मतदार सध्या वंचितकडे ओळणार असल्याचे दिसते. महाराष्ट्रात सर्वच मतदार संघात मोठी अटितटीची लढाई आहे. मोदी शासनाने कबूल केले आहे की, १७ लाख कुटुंबानी भारत सोडला आहे. अनेकांनावर दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे ते परदेशात जावून बसले आहेत. अझानच्या भूमिकेमुळे मुस्लिम मतदार एकतर्फी वसंत मोरे यांना मतदान करतील. मोरे यांनी मुस्लिमांची बाजू घेतली म्हणून त्यांना डावलले जात होते. पुण्यातील उमेदवार मोठ्या फरकाने निवडणून येणार नाही.

यंदा मोदींना ३०० पेक्षा कमी जागा मिळतील 

देशात सध्या संविधान बदलणार असल्याचे भाजपाच्या नेतेकडून बोलले जात आहे. तशी परस्थिती निर्माण केली जात आहे. मात्र मोदी हे बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही, असा खोटा दावा करत आहेत. मात्र ते पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांना कायद्यात बदल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते बोलत आहे. सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात राग आहे. तो राग मतदानातून दिसेल. त्यामुळे सध्या विविध सर्व्हे भाजपला ३०० पेक्षा कमी मिळतील असे चित्र दिसत आहे.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJayant Patilजयंत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४