सुप्रिया सुळे यांचे उपोषण लांबणीवर; पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांचा सुळे यांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:59 IST2025-03-04T09:58:54+5:302025-03-04T09:59:59+5:30

बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दूरवस्था झालेल्या रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करण्याचा शब्द ते पाळतील आणि हा रस्ता ते दिलेल्या वेळेनुसार पुर्ण करतील

Supriya Sule agitation extended PMRDA Commissioner yogesh Mhase call to supriya Sule | सुप्रिया सुळे यांचे उपोषण लांबणीवर; पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांचा सुळे यांना फोन

सुप्रिया सुळे यांचे उपोषण लांबणीवर; पीएमआरडीएचे आयुक्त म्हसे यांचा सुळे यांना फोन

नसरापूर (पुणे) : श्री क्षेत्र बनेश्वर येथील देवस्थानाकडे जाणारा बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दूरवस्था झालेल्या रस्त्याचे संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या दिलेल्या इशाऱ्यांमुळे पीएमआरडीए चे आयुक्त योगेश म्हसे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पीएमआरडीए'चे इंजिनिअर्स या रस्त्याची पाहणी करतील आणि नंतर पुढील दोन आठवड्यांत हा रस्ता तातडीने दुरुस्त केला जाईल असे सांगितल्याने दि. ४ मार्च रोजीचे उपोषण रद्द करण्यात आले आहे.

 बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दूरवस्था झाल्याने गेले अनेक दिवस नसरापूर सह पंचक्रोशीतील नागरिक आणि श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट याकरीता या विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्कात होते. त्यामुळे महाशिवरात्रीपूर्वी सदर रस्ता व्हावा याकरीता सुळे यांनी प्रशासकीय पत्रव्यवहार केला होता परंतू त्यास प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही अन् या रस्त्याचे काम झाले नव्हते. 

महाशिवरात्रीला सुप्रिया सुळे श्री बनेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी बनेश्वरचा रस्ता न झाल्याने त्यांनी दि. ४ मार्च रोजी उपोषण जिल्हा प्रशासनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. येत्या दोन दिवसात पीएमआरडीए'चे इंजिनिअर्स या रस्त्याची पाहणी करतील आणि नंतर पुढील दोन आठवड्यांत हा रस्ता तातडीने दुरुस्त केला जाईल पीएमआरडीए चे आयुक्त योगेश म्हसे यांनी फोन वरून सुळे यांना कळवून पुढील सहा महिन्यांत बनेश्वर विकास आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन पीएमआरडीए कडून खासदार सुळे यांना मिळाले असून दि ४ मार्च रोजीचे उपोषण रद्द करण्यात आले आहे. 

बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या दूरवस्था झालेल्या रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करण्याचा शब्द ते पाळतील आणि हा रस्ता ते दिलेल्या वेळेनुसार पुर्ण करतील ही अपेक्षा आहे. यामुळे उद्याचे उपोषण मी दोन आठवड्यांसाठी स्थगित करीत आहे. परंतु जर दिलेल्या वेळेत हा रस्ता झाला नाही तर मला उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. -  खासदार सुप्रिया सुळे

Web Title: Supriya Sule agitation extended PMRDA Commissioner yogesh Mhase call to supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.