भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील धुमाळ यांनी उचलले टोकच पाऊल
By विवेक भुसे | Updated: December 20, 2023 16:19 IST2023-12-20T16:18:27+5:302023-12-20T16:19:52+5:30
सुनील मधुकर धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना

भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील धुमाळ यांनी उचलले टोकच पाऊल
पुणे : भारतीय जनता पार्टीचे हडपसर युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील मधुकर धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुणेरेल्वेपोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे. सुनील मधुकर धुमाळ (वय ४६, रा. साडेतरानळी, हडपसर, पुणे) असे आत्महत्या केलेले भाजपा सरचिटणीसचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर रेल्वे मार्गावर केशवनगर परिसरात मंगळवारी सकाळी एक मृतदेह आढळून आला होता. तो मृतदेह सुनील धुमाळ यांचा असल्याचे लक्षात आले. त्या ठिकाणी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. सुनील यांनी आत्महत्या केली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
सुनील धुमाळ हे भारतीय जनता पार्टीचे हडपसर युवा मोर्चाचे सरचिटणीस म्हणून काम पहात होते. त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी आणि मुले असा परिवार आहे.