Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान दिला; अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:25 IST2026-04-09T15:22:54+5:302026-04-09T15:25:01+5:30

अजितदादांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी अशी बारामतीकरांची इच्छा होती

Sunetra Pawar's request was accepted; Congress finally withdraws from Baramati by-election | Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान दिला; अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान दिला; अखेर बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

पुणे :  बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. महायुतीतील प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून पवार यांच्या उमेदवारीला बळ अन् पाठिंबा दिला. तसेच लक्ष्मण हाके यांनी माघार घेत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. परंतु करुणा मुंडे, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे सुद्धा रिंगणात उतरले होते. अखेर सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत काँग्रेसने आज बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. 
 
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त जागा झाली होती. त्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. अजितदादांवरील बारामतीकरांचे प्रेम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे भाजप आणि शरद पवार पक्षाने याठिकाणी उमेदवार न देण्याचे जाहीर केले. परंतु काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे उमेदवार दिला होता. ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून माघार घेण्याची विनंती केल्याची माहिती सपकाळ यांनी दिली. अखेर आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. आता बारामती विधानसभेत अजित पवारांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांचा नावाचा शिक्कामोर्तब झाला आहे.    

Web Title : सुनेत्रा पवार के अनुरोध पर बारामती उपचुनाव से कांग्रेस ने नाम वापस लिया

Web Summary : सुनेत्रा पवार के अनुरोध के बाद कांग्रेस ने बारामती उपचुनाव से नाम वापस ले लिया। सुनेत्रा पवार ने महायुति नेताओं के समर्थन के साथ अपना नामांकन दाखिल किया। अजित पवार की मृत्यु के बाद बारामती सीट खाली हो गई थी। कांग्रेस उम्मीदवार आकाश मोरे ने शुरू में चुनाव लड़ा, लेकिन पार्टी ने अंततः नाम वापस लेने के अंतिम दिन नाम वापस ले लिया।

Web Title : Congress Withdraws from Baramati Bypoll Following Sunetra Pawar's Request

Web Summary : Congress withdrew from the Baramati by-election after Sunetra Pawar's request. Sunetra Pawar filed her nomination with support from Mahayuti leaders. The Baramati seat fell vacant after Ajit Pawar's death. Congress candidate Akash More initially contested, but the party ultimately withdrew on the last day for withdrawals.