इंदापुर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 18:52 IST2019-12-19T18:49:18+5:302019-12-19T18:52:51+5:30
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

इंदापुर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या
बिजवडी:इंदापुर शहरात वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी(दि १९) दुपारी १२ च्या सुमारास घडली.आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याप्रकरणी अश्विनी युवराज फाळके (वय ३३ वर्ष, रा.सावित्रीबाई फुले वस्तीगृह इंदापूर, जि. पुणे ) यांनी पोलिसांत माहिती दिली. प्रणाली पोपट दळवी ( वय १७ वर्ष रा. गुहेगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्रणालीने तिच्या वस्तीगृहातील रूम नंबर ९ मध्ये युनिफॉर्मच्या ओढणीच्या साह्याने गळफास घेतल्याचे आढळले. त्यानंतर सुरक्षारक्षक व काही जणांच्या मदतीने तिला उतरविण्यात आले. तात्काळ उपचारासाठी यशोदीप रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला.