पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 21:47 IST2018-09-28T21:45:55+5:302018-09-28T21:47:04+5:30

घरगुती कारणावरून शारिरीक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने बुधवारी विष पिऊन आत्महत्या केली

Suicide by married women due to drunk poison | पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

पुणे : घरगुती कारणावरून शारिरीक व मानसिक छळ केल्याने विवाहितेने बुधवारी विष पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पतीस कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. 
मनाली आकाश पांडीयान (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आकाश देवा पांडीयान (वय ३०, रा. गुलमोहर आर्पाटमेंट, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रिबेका पिल्ले (वय ४७, रा. खडकी बाजार चौक) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि मनाली यांचा ६ जुनला प्रेमविवाह झाला होता. मात्र, आकाशच्या कुटुंबियांना हा विवाह मान्य नव्हता. त्यावरू त्यांच्यात वादही झाले होते. लग्नानंतर काहीच दिवसांत आकाश हा मनाली यांना घरगुती कारणावरून सतत टोचून बोलू लागला. तसेच तो मनाली यांचा शारीरिक आणि मानसिक छळ त्रासाला कंटाळून मनाली यांनी विष पिऊन आत्महत्या केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. ए. पवार करीत आहेत. 

Web Title: Suicide by married women due to drunk poison