Suicide: पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडीत ५५ वर्षीय व्यक्तीची फांदीला गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 19:34 IST2022-03-03T19:34:35+5:302022-03-03T19:34:44+5:30

पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने झाडाचे फांदीला दोरीच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Suicide: A 55-year-old man committed suicide by hanging himself in Chiwewadi in Purandar taluka | Suicide: पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडीत ५५ वर्षीय व्यक्तीची फांदीला गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडीत ५५ वर्षीय व्यक्तीची फांदीला गळफास घेऊन आत्महत्या

सासवड : पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने झाडाचे फांदीला दोरीच्या सहाय्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पुतण्याने सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप भिकू वाशीलकर (वय ५५ वर्षे) रा. चिव्हेवाडी यांना दारूचे व्यसन होते. दिनांक 3 /3 /2020 रोजी सकाळी आठ वाजता सुमारास फिर्यादी यांच्या चुलती मंदा दिलीप वाशीलकर त्यांच्या घरी आल्या व म्हणाल्या की दिलीप रात्री खूप दारू पिला होता. सकाळी आम्ही उठलो तेव्हा तो घरात नव्हता तो कुठेतरी निघुन गेला आहे. तेव्हा फिर्यादी व गावातील लोकांनी त्यांचा गावात व आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना दिलीप यांनी झाडाला फाशी घेतलेली दिसले. सदर घटनेत बाबत त्यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे फोन करून कळवले. त्यानंतर सासवड पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले होते. दिलीप भिकू वाशीलकर यांचे शव ॲम्बुलन्स मध्ये घेऊन पुढील कार्यवाही करता जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथून घेऊन गेले आहेत. सासवड पोलिस तपास पुढील करीत आहेत.

Web Title: Suicide: A 55-year-old man committed suicide by hanging himself in Chiwewadi in Purandar taluka