शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स कंपनीवर गुन्हा दाखल करा

By admin | Updated: March 5, 2015 00:23 IST

रिलायन्स कंपनीने येरवडा परिसरामध्ये बेकायदेशीरपणे ९ किमी अंतराची ओव्हरहेड वायर टाकल्याचे आढळून आल्याने कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा,

पुणे : रिलायन्स कंपनीने येरवडा परिसरामध्ये बेकायदेशीरपणे ९ किमी अंतराची ओव्हरहेड वायर टाकल्याचे आढळून आल्याने कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बुधवारी दिले आहेत. यापुर्वी खोदाईची कामे करताना रिलायन्स कंपनीकडून धमक्यांचे फोन आल्याचा तसेच पैशांचे आमिष दाखविल्याचा आरोप नगरसेवकांनी केला होता.शहरामध्ये रिलायन्स कंपनीकडून ४ जी लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. महापालिकेमध्ये १५० कोटी रूपये शुल्क भरून त्यांनी या खोदाईसाठी परवानगी घेतली आहे. खोदाई करूनच लाइन टाकणे बंधनकारक आहे. ओव्हरहेड वायर टाकण्यास पालिकेकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्यता देण्यात येत नाही. मात्र येरवडा परिसरात रिलायन्स कंपनीने ओव्हरहेड वायर टाकल्याचे पाहणीमध्ये आढळून आले. त्यानंतर याप्रकरणी रिलायन्स कंपनीला नोटीस बजावण्यात आली होती.अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यापुढे याप्रकरणाची सुनावणी झाली. दुसरे कोणीतरी रिलायन्स कंपनीच्या नावाने या ओव्हरहेड वायर टाकल्या आहेत, रिलायन्स कंपनीला त्रास देण्याच्या हेतूने हा प्रकार केल्याचे म्हणणे कंपनीकडून मांडण्यात आले. येरवड्यात सापडलेल्या ओव्हरहेड वायरवर रिलायन्स कंपनीचे नाव व लोगो आढळून आला आहे. कोथरूडमध्ये परवानगी घेतलेल्या ठिकाणी रिलायन्स कंपनीकडून खोदाईचे काम केले जात होते. याविरूध्द जाब विचारणाऱ्या नगरसेवकांना गुंडांकडून धमकीचे फोन करण्यात आले. तसेच पैशांचे आमिषही दाखविण्यात येते अशी तक्रार नगरसेवक प्रशांत बधे, पुष्पा कनोजिया, राहुल तुपेरे, माजी नगरसेवक उज्वल केसकर, मनसेचे उपशहराध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी अतिरिक्त नगरअभियंता विवेक खरवडकर यांच्याकडे केली होती. यामध्ये तथ्य आढळून आल्याने कंपनीला १६ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता. (प्रतिनिधी)रिलायन्स कंपनीने ९.३ किमी अंतरावर बेकायदेशीरपणे ओव्हरहेड वायर टाकल्याचे आढळून आला. त्यामुळे विद्युत विभागाच्या अधिका-यांनी येरवडा पोलिस स्थानकांमध्ये कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करावा असे सांगितले आहे. - ओमप्रकाश बकोरिया,अतिरिक्त आयुक्त