शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालय ‘सलाईन’वर

By admin | Updated: April 28, 2017 05:52 IST

पूर्वीच्या बारामती नगरपालिकेच्या मालकीचे रुग्णालय आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. सिल्व्हर ज्युबिली शासकीय

बारामती : पूर्वीच्या बारामती नगरपालिकेच्या मालकीचे रुग्णालय आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाला सध्या १०० बेडची मंजुरी आहे. नगरपालिकेने हस्तांतरित केलेल्या जागेवर टोलेजंग इमारत उभी राहिली. मात्र, मंजूर वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची जवळपास ५० टक्केच पदे भरली आहेत. त्यामुळे सध्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवरच बारामतीचे रुग्णालय चालविण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील ताळमेळ नसतो, अशा तक्रारी अनेकदा झाल्या. तातडीच्या उपचाराला विलंबच लागतो. शेवटी रुग्णांचे नातेवाईक ‘तोंडसुख’ घेतात. त्यामुळे या हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा सुधारणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘आॅनकॉल’ डॉक्टरांवर भरोसा...मागील काही वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी जागेवर नसतात. त्यामुळे त्यांच्या गैरहजरीत सर्व अनागोंदी कारभार असतो. रात्रीच्या वेळी तातडीची रुग्णसेवा मिळत नाही, अशी तक्रार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आहे. खर्च करण्याची ऐपत नसतानादेखील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करावे लागते. अथवा त्यांना तसा सल्ला याच रुग्णालयातून दिला जातो. त्यामुळे टोलेजंग इमारत बांधून रुग्णसेवेत दाखल झालेल्या या सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात चांगली रुग्णसेवा कधी मिळणार, अशी विचारणा केली जात आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून आज या रुग्णालयाच्या सेवेची पाहणी करण्यात आली. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. विशेषत: मंजूर पदे असताना त्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे ‘आॅनकॉल’ खासगी डॉक्टरांवर रुग्णांना अवलंबून राहावे लागते.