शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मिळणार पृथ्वीवरील कुठलाही फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 13:36 IST

येत्या १२ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना यात भाग घेऊन पृथ्वीवरील कुठलेही छायाचित्र ' नासा ' कडून मिळवता येत आहे. 

ठळक मुद्देनासाकडून खास उपक्रम : १२ एप्रिलपर्यंत सहभागी होता येणार विद्यार्थ्यांना पृथ्वीवरील हवे ते छायाचित्र मिळणार अर्थकॅम मिशनचे सेंटर अमेरिकेतून नियंत्रित करण्यात येते.

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वीबाबत आणि अवकाशाबाबत गोडी निर्माण व्हावी,  पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे चित्र पाहता यावे आणि ते मिळवता यावे, यासाठी नासा संस्थेतर्फे सॅली राइड एर्थकॅम(’edge Acquired by ddMÑ’e schoo’ stude)  नावाचा उपक्रम सुरू आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येते. येत्या १२ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना यात भाग घेऊन पृथ्वीवरील कुठलेही छायाचित्र ' नासा ' कडून मिळवता येत आहे. ' नासा ' संस्थेकडून विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांना पृथ्वीबाबतचे ज्ञान व्हावे यासाठी विविध उपक्रम सुरू केल्याची माहिती न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडमधील तारांगण चे प्रमुख आणि खगोल अभ्यासक प्रा. व्ही. व्ही. रामदासी यांनी दिली. न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन पृथ्वीवरील छायाचित्रासाठी अर्ज भरले आहेत.   याउपक्रमातंर्गत RiYEÔrthKAMX Zissio.मधून विद्यार्थ्यांना पृथ्वीवरील हवे ते छायाचित्र मिळणार आहे. या छायाचित्रांवरून विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, भौगोलिक, मॅथीमॅटिक्सचा अभ्यास करता येणार आहे. हा प्रकल्प डॉ. सॅली राइड यांनी सुरू केला. त्या अवकाशात जाणाऱ्या अमेरिकेतील पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. सॅली राइड या स्पेसमध्ये जाणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला ठरल्या. त्यांनी स्पेसमधून पृथ्वी पाहिली आणि त्यांना पृथ्वीचे सुंदर रूप दिसले. ही सुंदरता इतरांनी पाहावी आणि त्याचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांच्या नावाने इंटरनॅशनल स्पेस सेंटरने कॅमेरा लावला आहे.  

येथे करा नोंदणी   अर्थकॅम मिशनचे सेंटर अमेरिकेतून नियंत्रित करण्यात येते. या अर्थकॅम प्रकल्पात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.eÔrth‘ZÔ.org/register..या ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक आहे. यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. 

   चार दिवस फोटोसाठी ऑरर्बिट उपलब्ध विद्यार्थ्यांनी एर्थकॅम या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करायची आहे. त्यात लॉगिन पासवर्ड मिळतो. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ज्या लोकेशनचे छायाचित्र हवे त्याची माहिती अपलोड करणे आवश्यक असते. चार ऑरर्बिटची (कक्ष) नावे संकेतस्थळावर असतात. ते निवडून त्या ऑरर्बिट ज्या ठिकाणाहून जाणार असतील, त्याच्या परिसरातील कोणतेही ठिकाणाचे छायाचित्र तुम्हाला मिळू शकते. ९ ते १२ एप्रिल दरम्यान हे ऑरर्बिट उपलब्ध असतील. जे लोकेशन निवडले आहे, तिथले हवामान अगोदर तपासले पाहिजे. कारण ढगाळ वातावरण असेल, तर छायाचित्र मिळत नाही.

-----------------------------------------------------------इंटरनँशनल स्पेस सेंटरमध्ये सहा खगोलशास्त्रज्ञ कार्यरत आहेत. ते या प्रोग्रँमवर लक्ष ठेवून असतात. या स्पेस सेंटरमध्ये कँमेरा लावलेला आहे. हे सेंटर पृथ्वीभोवती फिरत असते. 90 मिनिटात पृथ्वीची एक प्रदक्षिणा हे सेंटर पूर्ण करते. हे सेंटर आपल्या महाराष्ट्रावरून जात आहे. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी सह्याद्रीचा फोटो मागविला आहे. तसेच गंगा नदी, अमेरिकेत एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्याचा फोटो मागविला आहे. हे फोटो स्पेस सेंटर संबंधित ठिकाणाच्या वरून गेले की, फोटो काढते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळते. - व्ही. व्ही. रामदासी, खगोलतज्ज्ञ आणि तारांगण प्रमुख, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड 

टॅग्स :PuneपुणेNASAनासाscienceविज्ञानStudentविद्यार्थी