शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी म्हणतात, न्यायालयात जाऊ

By admin | Updated: July 10, 2015 01:57 IST

संचालकांच्या निवड पॅनलवर पुन्हा सदस्यपदी चौहान यांचीच वर्णी लागल्याने स्टुडंट असोसिएशन अधिकच संतापले आहे.

पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची झालेली नियुक्ती रद्द करण्याची मागणी अद्याप मान्य झालेली नसताना संचालकांच्या निवड पॅनलवर पुन्हा सदस्यपदी चौहान यांचीच वर्णी लागल्याने स्टुडंट असोसिएशन अधिकच संतापले आहे. आंदोलनाला जवळपास महिना होत आला, तरी केंद्रीय विज्ञान व प्रसारण मंत्रालयाने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. शासनाबरोबर दुसरी बैठक करण्यास आम्ही तयार आहोत, तरीही या आंदोलनावर कोणताही तोडगा न निघाल्यास शासनाने केलेल्या सर्व नियुक्त्यांवर स्थगिती आणण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही असोसिएशनने दिला आहे.आंदोलनाचे शस्त्र विद्यार्थ्यांनी उगारले असले, तरी त्यांच्या नियुक्तीसंदर्भातील मागण्यांवर शासनाने अद्याप कोणतीच भूमिका घेतलेली नाही; उलट हे आंदोलन दाबण्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये आजपर्यंत केलेली ३९ आंदोलने, संस्थेचे खासगीकरण किंवा ती बंद करण्याच्या धमक्या शासनपातळीवर दिल्या जात असल्याचा आरोप असोसिएशनचे प्रवक्ता राकेश शुक्ला आणि रणजित नायर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. १३ जुलै रोजी मुलाखती होणार आहेत. ज्या व्यक्तींची निवड केली जाईल, त्यांनाही विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)> काँग्रेसच्या काळात निष्ठावान कार्यकर्त्यांना पेट्रोलपंपांचे वाटप किंवा प्रदेशाध्यक्षपद वगैरे दिले जात असे; पण सत्ताधारी सरकारने तर लघुपट किंवा प्रचार मोहिमेच्या चित्रफिती करणाऱ्या कार्यकर्त्यांना संस्थेच्या अध्यक्षपदीच विराजमान केले आहे. शासन या नियुक्त्या विद्यार्थ्यांवर लादत आहे. या लोकांपेक्षा संस्थेमधील कर्मचाऱ्यांना नाटक आणि चित्रपटाविषयी अधिक जाण आहे. कुठल्या देशात किती आयुधे आहेत, याचे मोजमाप त्या देशातील कलासंस्कृतीमधून कळते. नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून देशाची प्रतिष्ठा असलेल्या एफटीआयआयच्या संस्थेवर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. सांस्कृतिक चळवळ मोडीत काढण्याचा हा प्रयत्न असल्याचे अभिनेते नंदू माधव यांनी सांगितले. मुकेश खन्ना यांनी जनतेची माफी मागावीचिल्ड्रन सोसायटी आॅफ इंडियाचे संचालक मुकेश खन्ना यांनी संस्थेवर कोणाची नियुक्ती करायची, हा अधिकार पूर्णत: शासनाचा आहे.विद्यार्थ्यांना तो मान्य नसेल, तर त्यांनी संस्था सोडून बाहेर पडावे, असे विधान केले. याबाबत संताप व्यक्त करून हे विधान लोकशाहीच्या विरोधात असून, हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे खन्ना यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी शुक्ला यांनी केली. नियुक्तींचे निकष सांगाशासनाने एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यपदासाठी कोणते निकष लावले आहेत, ते आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. हे आंदोलन आम्ही आमच्यासाठी नव्हे तर पुढच्या पिढीसाठी करीत आहोत, असे शुक्ला म्हणाले.रणबीर कपूरचा आंदोलनाला पाठिंबाफिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीच्या निर्णयावरून सुरू असलेल्या वादात अभिनेता रणबीर कपूरनेही उडी घेतली असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. ‘विद्यार्थ्यांना ज्या व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल, अशा व्यक्तीची संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती व्हावी, असे मत एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेने प्रदर्शित केलेल्या ध्वनिचित्रफितीमध्ये रणबीरने मांडले आहे. एफटीआयआय ही चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, एडीटर तसेच पुरस्कारविजेती व्यक्तिमत्त्वे घडवणारी संस्था आहे. या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आदराने पाहिले जाते. मात्र, काही दिवसांपासून संस्थेविषयी नकारात्मक गोष्टी ऐकू येत आहेत. या संस्थेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्या मागण्या लक्षात घेतल्या पाहिजेत,’ असे रणबीरने म्हटले आहे.