Pune: विद्यार्थ्याने केले प्राध्यापिकेचे सेक्सटॉर्शन; अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

By विवेक भुसे | Updated: June 24, 2023 15:44 IST2023-06-24T15:43:32+5:302023-06-24T15:44:20+5:30

अमेरिकन डॉलरची केली मागणी...

Student Sextortion molestation of lady Professor Threats to make videos go viral | Pune: विद्यार्थ्याने केले प्राध्यापिकेचे सेक्सटॉर्शन; अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Pune: विद्यार्थ्याने केले प्राध्यापिकेचे सेक्सटॉर्शन; अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पुणे : प्राध्यापिकेला व्हॉटसअप कॉल करुन विद्यापीठात बदनामी करण्याची भिती घालून त्यांचा अश्लिल व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ५ हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. विद्यार्थ्यानेच आपल्या प्राध्यापिकेचे सेक्सटॉर्शन केल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे. याप्रकरणी हडपसरपोलिसांनी मयांक सिंग (वय २६, रा. पाटणा, बिहार) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मांजरी येथील एका ३६ वर्षाच्या प्राध्यापिकेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मार्च २०२० पासून आतापर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम करतात. तेथील मयांक सिंग याने त्यांच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर त्याने व्हॉटसअप कॉल करुन त्यांना "तुम्ही जर मी सांगतो असे केले नाही तर मी तुमची विद्यापीठात बदनामी करेल," अशी भिती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ कॉल इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर दुसऱ्या आयडीवरुन फिर्यादी यांना अनेक ऑडिओ व व्हिडिओ कॉल केले.

आणखी एका इन्स्टाग्राम आयडीवरुन फिर्यादी व त्यांचे पतीला फिर्यादीचे न्यूड व्हिडिओ पाठवून त्यांच्याकडे ५ हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. पैसे नाही दिले तर फिर्यादीचे न्यूड व्हिडिओ सगळीकडे पाठविण्याची धमकी दिली. हा प्रकार फिर्यादीच्या पतीला समजल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार दोन वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी त्याने सेक्सटॉर्शन केले होते. सध्या तो विद्यार्थी पुण्यात नाही. या प्राध्यापकांनी तेथील नोकरी सोडली आहे. त्याने त्याचा वापर करुन आता पैसे मागितल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

Web Title: Student Sextortion molestation of lady Professor Threats to make videos go viral