शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

मंचरमध्ये तणाव, वरवंड येथे लाठीचार्ज

By admin | Updated: August 5, 2015 03:08 IST

मतदान करण्यावरून होणारी बाचाबाची, विरोधक समोरासमोर आल्याने त्यांच्यात झालेली भांडणे, त्यामुळे काही ठिकाणी निर्माण झालेला तणाव, पण पोलिसांनी त्यात तातडीने

पुणे : मतदान करण्यावरून होणारी बाचाबाची, विरोधक समोरासमोर आल्याने त्यांच्यात झालेली भांडणे, त्यामुळे काही ठिकाणी निर्माण झालेला तणाव, पण पोलिसांनी त्यात तातडीने हस्तक्षेप करीत केलेली कारवाई यामुळे मावळमधील घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले़ अनेक तालुक्यांत मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे दिसून येत होते़ जिल्ह्यात सरासरी ८५ टक्क्यांच्या वर मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे़ दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ७३ टक्के मतदान झाले होते़ जिल्ह्यातील जुन्नर, वेल्हा, घोडेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांतील दुर्गम भागात सकाळपासूनच मतदानाला उत्साह दिसून आला़ अनेक ठिकाणी मतदान सुरूझाल्याबरोबर रांगा लागल्याचे चित्र दिसत होते़ त्यामानाने मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झालेल्या गावांमध्ये उत्साह कमी दिसून आला़ मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खासदार आणि आमदारांनी आपली शक्ती पणाला लावल्याने येथे अधिक चुरस दिसून येत होती़ त्यामुळे काही मतदान केंद्रांवर तणाव निर्माण झाला होता़ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली़ मतदान सुरू झाल्यानंतर सर्वत्रच उत्साह दिसून आला़ सकाळी मतदानाचा वेग चांगला होता़ अनेक ठिकाणी दुपारी १२ पर्यंतच ५० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते़ दुपारनंतर हा वेग मंदावला़ सायंकाळी मात्र, त्यात पुन्हा वाढ झाली़ बारामती तालुक्यात साधारण ८८ टक्के मतदान झाले असून, पश्चिम भागात सकाळपासूनच रांगा लागल्याचे दिसत होते़ अनेक ठिकाणी दोन पॅनलमध्ये चुरस दिसून आली़ इंदापूरला शांततेत मतदान पार पडले़ अनेक ठिकाणी मतदारांना ने-आण करण्यासाठी आलिशान गाड्यांची सोय केल्याचे दिसून येत होते़ इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात तुलनेने मतदानाचा वेग अधिक होता़ अनेक ग्रामपंचायतींत ९० टक्क्यांपर्यंत मतदान झाले़ हगारेवाडीत ९२ टक्के मतदान झाले, तर वालचंदनगरमध्ये सर्वांत कमी ६२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला़