story of Pune housekeeper Geeta Kale visiting card | घरकाम करणाऱ्या गीताताई झाल्या ग्लोबल ; व्हिजीटिंग कार्ड जगभर व्हायरल
घरकाम करणाऱ्या गीताताई झाल्या ग्लोबल ; व्हिजीटिंग कार्ड जगभर व्हायरल

पुणे :इंटरनेटच्या जमान्यात क्षणात जगभर काय व्हायरल होऊ शकले याचा अंदाज नाही. व्हॉट्स ऍप , फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमांचा वापर वाढल्याने अनेक व्हिडीओ आणि फोटो यांचा अक्षरशः दररोज पाऊस पडताना दिसतो. अशीच एक घटना पुण्यात घडली असून घरकाम करणाऱ्या गीता काळे या रातोरात जगभर व्हायरल झाल्या आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, गीताताई या धनश्री शिंदे यांच्याकडे घरकाम करतात. तिथे त्यांनी एकदा धनश्री यांना अधिक कामांची गरज असल्याचे सांगितले. त्यावर धनश्री यांनी विचार करून त्यांना व्हिजिटिंग कार्डची कल्पना सुचली. त्यांनी ते ताबडतोब डिझाईन केले. त्यावर गीता यांचा मोबाईल नंबर, भांडी घासणे, कपडे धुणे आणि झाडूकामाचे दरही टाकण्यात आले. त्यात अधिक स्पष्टता यावी म्हणून आधार कार्ड नंबरही जोडण्यात आला. प्रत्यक्षात कार्ड हातात आल्यावर धनश्री यांनी ते आपल्या एका स्नेही व्यक्तीला पाठवलं आणि त्यांनी ते एका ग्रुपवर शेअर केलं आणि झालं. 

मागील दोन दिवसांपासून गीता यांचा फोन फक्त पुणे नाही तर देशभरातून खणखणत आहे. इतका प्रचंड प्रतिसाद बघून त्यांनी त्यांचा फोनच बंद करून ठेवला आहे. हे काय चाललंय आणि कसं झालं याचा अंदाजही त्यांना येत नाहीये पण त्यांचे व्हिजिटिंग कार्ड मात्र प्रत्येक ग्रुपवर हमखास बघायला मिळत आहे. धनश्री म्हणाल्या की, ' त्यांना अधिक घरांचे काम मिळावे म्हणून मी त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने हा प्रयोग केला होता. त्याला मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. अनेकांनी मला हे कार्डचे फोटो पुन्हा फॉरवर्ड केले आहेत'. सध्या तरी व्हिजिटिंग कार्डमुळे व्हायरल झालेल्या गीताताई हरखून गेलेल्या बघायला मिळत आहेत. 

Web Title: story of Pune housekeeper Geeta Kale visiting card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.