शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना पडल्या बंद

By admin | Updated: August 14, 2015 03:15 IST

दौंड तालुक्याच्या जिरायत भागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पावसाने दडी मारल्याने जनावरांच्या तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे.

वासुंदे : दौंड तालुक्याच्या जिरायत भागात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पावसाने दडी मारल्याने जनावरांच्या तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. पाण्याअभावी या भागातील काही गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनाही बंद पडल्या आहेत. तर, काही गावाच्या पाणीपुरवठा योजनांची पाणीपातळी खालावल्याने त्या अडचणीत आल्या आहेत. तालुक्यातील वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, कुसेगाव, पडवी, पांढरेवाडी परिसरातील तलाव व बंधारे ऐन पावसाळ्यातही कोरडे ठणठणीत असल्याने या भागातील शेती ही पूर्णपणे अडचणीत आली आहे. पावसाअभावी जिरायत भागातील भूजलपातळीत नीचांकी घट झाली आहे. पाणीपातळी खालावल्याने हिंगणीगाडा (ता. दौंड) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना अडचणीत आली आहे. गावासाठी सुरू असलेला पाणीपुरवठाही यामुळे तीन महिन्यांपासून बंद पडला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. वासुंदे येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी उपयुक्त असलेल्या बोअरवेलचीही पाणीपातळी अत्यंत कमी झाली आहे. या ठिकाणच्या नागरिकांनासुद्धा नजीकच्या काळात तीव्र पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जवळपास अशाच प्रकारची स्थिती कमीअधिक प्रमाणात या भागातील सर्वच गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची झाल्याने जनतेला पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.तालुक्यातील ताम्हाणवाडी येथील नागरिकांना शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा अद्यापही सुरू आहे. त्यामुळे अजूनही पुरेसा पाऊस न झाल्यास व पावसाने ओढ दिल्यास दौंड तालुक्याच्या दुष्काळी भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, या भागातील टँकरची मागणी वाढणार आहे.