शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी बंद करा!

By admin | Updated: February 12, 2015 23:51 IST

रांजणगाव एमआयडीसीने सांडपाणी केंद्रातील पाणी खाली फलकेमळ््यापर्यंत ओढ्यांना सोडणे बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण आढावा

शिरूर : रांजणगाव एमआयडीसीने सांडपाणी केंद्रातील पाणी खाली फलकेमळ्यापर्यंत ओढ्यांना सोडणे बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण आढावा बैठकीत आज दिले. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि. या कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. रांजणगाव एमआयडीसीतील उद्योगांमुळे होत असलेल्या प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीची आज येथील तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. तहसीलदार रघुनाथ पोटे अध्यक्षस्थानी होते. या एमआयडीसीतील अनेक कारखाने सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सामुदायिक सांडपाणी केंद्रात सोडतात. या केंद्रातही या पाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी ओढ्याला सोडले जाते. ते पाणी फलकेमळ््यापर्यंत जाऊन पोहोचते. या दूषित पाण्यामुळे विहिरींच्या पाण्याचे स्रोत खराब झाले आहेत. याबाबत क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना अवगत केले. यावर सोमवारपर्यंत सामुदायिक सांडपाणी केंद्रातून ओढ्याला पाणी सोडणे बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ यांनी एमआयडीसीला दिले.पेप्सिको, पॉली व अ‍ॅब्जॉटिक या कारखान्यांनी एमआयडीसीच्या पाईपलाईनला सांडपाणी सोडू नये, असे आदेश देण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सरदवाडी व कर्डेलवाडी या गावांना एमआयडीसीने पाईपलाईन टाकून मोफत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी पाचंगे यांनी बैठकीत केली. (वार्ताहर)