शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

चोरलेल्या वाहनांचा केला जातो वापर चोरीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सध्या दररोज ४ ते ५ वाहने चोरीला जात असून त्यातील निम्म्यांहून अधिक वाहने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात सध्या दररोज ४ ते ५ वाहने चोरीला जात असून त्यातील निम्म्यांहून अधिक वाहने ही कधीच सापडत नाही. अनेकदा चोरटे वाहन चोरी करुन त्याचा वापर करुन चोरी करताना आढळून आले आहे. शहरात जानेवारी ते डिसेंबर अखेर ९६७ वाहने चोरीला गेली असून त्यापैकी केवळ ३८ टक्के वाहनांचा शोध लावण्यात यश आले आहे.

चोरीच्या कामासाठी वापर

पुणे, मुंबईसारख्या शहरातून यापूर्वी आलिशान कार चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. या कारचा वापर राजस्थान सीमेवर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी केला जात असल्याचे आढळून आले आहे. बकर्या चोरीसाठी चोरट्यांनी ५० हून अधिक वाहने चोरल्याचे उघड झाले आहे. ट्रक व इतर जड वाहने चोरुन ती भंगारच्या दुकानात नेऊन त्यांची मोडतोड करुन त्याचे पार्ट विकणारी टोळी पोलिसांनी पकडली होती. त्यांनी अनेक वाहने तोडून त्यांचे स्पेअरपार्ट वेगळे करुन त्याची विक्री केली होती. पुण्यात चोरलेली वाहने सोलापूर, बार्शी तसेच मराठवाड्यातील शहरांमध्ये विकली जातात. त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली जातात. अनेकदा गाडी विकताना सुरुवातीला हे चोरटे पैसे घेतात, कागदपत्रे नंतर आणून देतो, मग उरलेले पैसे द्या, असे सांगतात. पण नंतर त्यांना कागदपत्रे दिलीच जात नाही.

मौजेसाठी, प्रेयसीवर इम्प्रेशन मारण्यासाठी

अनेक तरुण मौजमजेसाठी वाहने चोरत असल्याचे आढळून आले आहे. त्यातील पेट्रोल संपल्यावर ते कोठेही वाहने सोडून देत असल्याचे आढळून आले आहे. एका प्रेमवीराने तर प्रेयसीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी महागड्या दुचाकी वाहने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

--

शहरातील महत्वाच्या गुन्ह्यांपैकी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात अनेक अडथळे असतात. त्यात प्रामुख्याने दुचाकीची वाहनांची वाढती संख्या असल्याने चोरीचे वाहन कोणते हे ओळखणे अवघड जाते. त्यामुळे गेल्या वर्षी साधारण दुचाकी वाहनांचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ३० टक्के, तीन चाकी वाहन चोरीचे उघडकीस येण्याचे प्रमाण ५८ टक्के व चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण साधारण ३६ टक्के इतके राहिले आहे. अनेकदा एखादा चोरटा पकडण्यानंतर त्याच्याकडून अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येत असतात.

वाहन चोरी

२०२० ९६७

२०१९ १६७८

कोट

वाहनचोरी ही प्रामुख्याने दुसरा चोरीचा गुन्हा करण्यासाठी केली जात असते. अनेकदा शहरात चोरलेली वाहने खेडगावात विकण्याचे प्रकार घडतात. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेणार्या चोरट्यांपैकी बहुतांश चोरटे ही असे गुन्हे करताना चोरीच्या वाहनांचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.

- सुनील पंधरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक