कांद्याच्या पिशव्या चोरीला

By Admin | Updated: August 7, 2015 00:50 IST2015-08-07T00:50:42+5:302015-08-07T00:50:42+5:30

बेलसरवाडी (ता़ आंबेगाव) येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल रंगनाथ कुरकुटे यांच्या अंदाजे ४५ कांद्याच्या पिशव्या व ४६ टोमॅटोची रिकामी कॅरेट बुधवारी मध्यरात्रीच्या

Stolen onion bags | कांद्याच्या पिशव्या चोरीला

कांद्याच्या पिशव्या चोरीला

निरगुडसर : बेलसरवाडी (ता़ आंबेगाव) येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल रंगनाथ कुरकुटे यांच्या अंदाजे ४५ कांद्याच्या पिशव्या व ४६ टोमॅटोची रिकामी कॅरेट बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेली़
बेलसरवाडी-वळसेमळा रस्त्यावर कुरकुटे यांची ५०० पिशव्या साठतील एवढी कांद्याची बराकी आहे़ त्यामध्ये २५० पिशव्या सध्या साठवणूक केलेल्या होत्या़ त्या ठिकाणीच टोमॅटोची रिकामी कॅरेट ठेवलेली होती़ काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कांद्याच्या पिशव्या बराकीतून भरल्या व शेजारील कॅरेटही गाडीत टाकून घेऊन गेले़ सकाळी नेहमीप्रमाणे ते बराकीवर गेले असता त्यांना बराकी फ ोडलेली दिसली व कॅरेटही आढळून आले नाही़ तेव्हा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी आजूबाजूला पाहिले असता, गाडीच्या टायरच्या खुणा त्यांना दिसल्या़ कांद्याला मिळणाऱ्या उच्चांकी भावमुळेच ही कांदाचोरी झाली असून, सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्यांचा १ लाख रुपये किमतीचा कांदा व २० हजार रुपये किमतीची कॅरेट चोरीला गेली आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Stolen onion bags