दागिने चोरणार्‍यास अटक

By Admin | Updated: May 28, 2014 02:08 IST2014-05-28T02:08:10+5:302014-05-28T02:08:10+5:30

रास्ता पेठेतील सराफाच्या दुकानातील पावणेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेणार्‍या कारागिरास समर्थ पोलिसांनी पश्चिम बंगालहून पकडून आणले़

Stolen jewelery stolen | दागिने चोरणार्‍यास अटक

दागिने चोरणार्‍यास अटक

पुणे : रास्ता पेठेतील सराफाच्या दुकानातील पावणेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेणार्‍या कारागिरास समर्थ पोलिसांनी पश्चिम बंगालहून पकडून आणले़ तापस जितेन चक्रपाणी (वय २४, रा़ पश्चिम बंगाल, सध्या रास्ता पेठ) असे त्याचे नाव आहे़ कमलेश कांतिलाल वर्मा (वय ३६, रा़ रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली होती़ वर्मा यांचा ‘कमलेश ज्वेलर्स’ हे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे़ त्यांच्याकडे तापस व अन्य दोन कारागीर कामास आहेत़ तापस ८ दिवसांपासून त्यांच्याकडे पॉलिशचे काम करत आहे.वर्मा यांनी त्यांच्याकडील दोन कारागिरांना पॉलिश करण्यासाठी सोन्याच्या बांगड्या, ब्रेसलेटचे अपूर्णावस्थेतील सोन्याचे चार तुकडे, कच्चे सोन्याचे तुकडे दिले होते़ तापसने २ लाख ७२ हजार ३०० रुपयांचे हे दागिने तसेच सुशांत गुचाईत या कारागिराच्या खिशातील ३०० रुपये व पॅनकार्ड घेऊन तो १८ मे रोजी पळून गेला होता़ समर्थ पोलीस पथकाने पश्चिम बंगालमधील परडोंगा येथे जाऊन चक्रपाणीला अटक केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Stolen jewelery stolen