सावत्र बापाचा लैंगिक अत्याचार, 15 वर्षीय मुलगी गर्भवती; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:26 IST2022-11-22T12:26:00+5:302022-11-22T12:26:47+5:30

पित्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे...

Stepfather sexually assaults, 15-year-old girl pregnant; Shocking incident in Pune | सावत्र बापाचा लैंगिक अत्याचार, 15 वर्षीय मुलगी गर्भवती; पुण्यातील धक्कादायक घटना

सावत्र बापाचा लैंगिक अत्याचार, 15 वर्षीय मुलगी गर्भवती; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : सावत्र बापाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे पंधरा वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. नराधम पित्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. 35 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला 35 वर्षे वयाची आहे तर आरोपी 25 वर्षे वयाचा आहे. फिर्यादी महिलेने आरोपी सोबत दुसरे लग्न केले होते. फिर्यादी यांच्या पहिल्या पतीपासून झालेल्या पंधरा वर्षीय मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. वारंवार केलेल्या या लैंगिक अत्याचारामुळे पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिली आहे. 

पीडित मुलीच्या आईच्या हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गार्डन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली. वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Stepfather sexually assaults, 15-year-old girl pregnant; Shocking incident in Pune