शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

इतिहासकालीन मस्तानी तलावाच्या खोलीकरणाला पीएमआरडीए कडून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:04 PM

१४ एकर क्षेत्रावर या तलावाची निर्मिती इसवी १७२० दरम्यान केली गेली. या तलावामध्ये पाणी साठा झाल्यास परिसरातील ४ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून खोलीकरणासाठी ३ कोटी निधीला मान्यता मस्तानी तलावाचा ५ कोटी निधी द्वारे पर्यटन केंद्र करणार

पुणे: महानगर क्षेत्रातील वडकी गावांतर्गत ऐतिहासिक मस्तानी तलावाचे खोलीकरणाचे काम शनिवार( दि २८ एप्रिल) पासून सुरु करण्यात आले. तलाव खोलीकरणाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे महानगर आयुक्त किरण गित्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. १४ एकर क्षेत्रावर या तलावाची निर्मिती इसवी १७२० दरम्यान केली गेली. या तलावामध्ये पाणी साठा झाल्यास परिसरातील ४ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तलावाची खोली भरपूर असल्यामुळे घाटातून वाहून जाणारे पाणी तसेच पावसाळ्यात नदीतून वाहून जाणारे पाणी पंप करून तलावात सोडले जाऊ शकते. मस्तानी तलावात सुमारे ५०,००० ब्रास गाळ असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाने केला आहे. कामाची सुरुवात १ जेसीबी मशीन आणि २ टिपरने झाली तर परिसरातील उद्योजक आणि गावकऱ्यांनी अजून मशीन्स उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. पीएमआरडीए क्षेत्रात विविध तलावांचे खोलीकरण करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सूचनेवरून ३ कोटी निधी मंजूर केल्यानंतर अशाप्रकारची जलसंधारणाची कामे परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने भविष्यात पाणी टंचाईवर मात होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरणPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्ते