शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

ढोल पथकांच्या तयारीला सुरुवात

By admin | Updated: July 10, 2015 02:02 IST

गणरायाच्या आगमनाला बराच अवधी असला, तरी गणरायाच्या स्वागत मिरवणुकांत मोठ्या दिमाखात सहभागी होणाऱ्या ढोल पथकांच्या तयारीला उपनगरांत सुरुवात झाली आहे.

कोथरूड : गणरायाच्या आगमनाला बराच अवधी असला, तरी गणरायाच्या स्वागत मिरवणुकांत मोठ्या दिमाखात सहभागी होणाऱ्या ढोल पथकांच्या तयारीला उपनगरांत सुरुवात झाली आहे. रात्री १० नंतर मोठ्या आवाजात वाद्य वाजविण्यास उच्च न्यायालयाने बंदी आणल्यानंतर ढोल पथकाला मागणी वाढली आहे. सुरुवातीला फक्त नदीपात्रातच घुमणारा ढोल- ताशांचा आवाज उपनगरांमध्येही घुमू लागला आहे. कोथरूड, कर्वेनगर अन् वारजे भागामध्ये सध्या ढोल पथकांची जोरदार तयारी सुरू असून, सध्या पथकांच्या आयोजकांची जागा अन् वादकांची शोध मोहीम सुरू आहे, तर काही पथकांच्या सरावालाही सुरुवात करण्यात आली असून कोथरूड भागात ढोलचे आवाज कानी पडू लागले आहेत.सुरुवातीला फक्त छंद म्हणून सुरू झालेला हा ढोल पथकांचा प्रयोग सध्या स्पर्धात्मक रूपाकडे वाटचाल करत आहे. अनुभवी पथकातील सभासदासाठी अनेकांची चढाओढ सुरू झाली आहे. पुणे शहर, मुंबईसह अन्य भागातील मिरवणुकांमध्येही ढोल वाजवण्याची संधी मिळत असल्याने अनेक संस्थांनी व्यावसायिक कामे करण्यास सुरुवात केली आहे. मानाच्या गणपतीच्या समोर वाजवण्याची संधी मिळवण्यासाठी जुन्या सीडी अन् सरावाच्या चित्रीकरणाचाही वापर सुरू झाल्याचे आयोजक सांगत आहेत. (वार्ताहर)ढोल पथकांची राजाश्रयाकडे वाटचालपुण्यातील ढोल पथक म्हणजे, समविचारी लोकांनी एकत्र येऊन सुरू केलेला प्रयोग, अशी ओळख असलेले ढोल लेझीम पथक सध्या राजाश्रयाकडे वाटचाल करत आहे. सर्वच राजकीय पक्षांना संपर्क वाढवण्यासाठी ढोल पथक माध्यम योग्य वाटत आहे. सध्याच्या व्यावसायिक अन् स्पर्धात्मक काळात तरुणांना एकत्र करून ढोल पथक सुरु करण्यापेक्षा, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून साहित्य जमा करून सराव करण्याकडे अनेक पथकांचा कल वाढला आहे.