‘तेरे को आज खल्लास कर देंगे’, तरुणावर चाकूने सपासप वार

By नितीश गोवंडे | Updated: December 18, 2023 14:23 IST2023-12-18T14:22:06+5:302023-12-18T14:23:44+5:30

खडकी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली

stabbed the young man with a knife in pune | ‘तेरे को आज खल्लास कर देंगे’, तरुणावर चाकूने सपासप वार

‘तेरे को आज खल्लास कर देंगे’, तरुणावर चाकूने सपासप वार

पुणे: जुन्या भांडणाच्या रागातून दोघांनी एका तरुणावर धारदार चाकूने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.१६) रात्री सव्वा अकराच्या सुमारास बोपोडी येथील आदर्श नगर येथे घडला आहे.

याप्रकरणी शिवा जयराम बन्सल (२१, रा. मदीना मस्जिद शेजारी, आदर्श नगर, बोपोडी) याने खडकी पोलिस ठाण्यात रविवारी (दि.१७) फिर्याद दिली आहे. यावरून छोटू उर्फ रविंद्र यादव (२२) आणि समीर उर्फ सॅम बाशा मुजावर (१९, रा. आदर्श नगर, बोपोडी) यांच्यावर गुन्हा दाखल करुन समीर उर्फ सॅम मुजावर याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी आणि फिर्यादी शिवा बन्सल हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. बन्सल यांचा भाऊ गणेश बन्सल (१९) याचे आणि आरोपी समीर मुजावर सोबत पूर्वी भांडण झाले होते. याचा राग मनात धरून आरोपी शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास बन्सल यांच्या घरी गेले, छोटू यादव याने शिवा बन्सल यांचा भाऊ गणेश याला घरातून बाहेर बोलवून घेतले.

छोटू यादव याने गणेश याला पाठिमागून पकडले. तर मुजावर याने ‘तेरे को आज खल्लास कर देंगे’ असे म्हणत सोबत आलेल्या धारदार चाकूने गणेश याच्या गळ्यावर, डोक्यावर, पाठीवर व हातावर सपासप वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी भांडण पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना चाकू दाखवून ‘हमारे बीच कोई आया तो काट डालूंगा’ असे म्हणून दहशत पसरवली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ करत आहेत.

Web Title: stabbed the young man with a knife in pune