दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी पलटी; एकाचा मृत्यू, पुरंदरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 13:36 IST2023-04-07T13:36:00+5:302023-04-07T13:36:10+5:30
बस मध्ये २९ प्रवाशी असून सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही

दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी पलटी; एकाचा मृत्यू, पुरंदरमधील घटना
सासवड : पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात राज्य परिवहन मंडळाची बस पलटी झाली असून यामध्ये एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे .झेंडेवाडी आरटीओ कॉर्नर जवळ टू व्हीलर आणि एसटी बसचा हा अपघात झाला. यामध्ये राज्य परिवहन मंडळाची बस पलटी झाली.
एस टी महामंडळाची ही बस पुण्याहून सासवडकडे येत असताना मोटरसायकल आणि बस यांच्यात धडक झाली. बस चालकाने टू व्हीलर चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी ही बस देखील पलटी झाली. बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात स्थानिक लोकांना यश आलंय. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. बस मध्ये २९ प्रवाशी होते. सुदैवाने यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला.