स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीनाथ भिमाले; राष्ट्रवादीकडून सुहास टिंगरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:12 IST2026-02-19T11:10:53+5:302026-02-19T11:12:08+5:30

स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य आहेत. त्यापैकी १२ सदस्य भाजपचे असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य आहे.

Srinath Bhimale from BJP for the post of Standing Committee Chairman; Suhas Tingre from NCP | स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीनाथ भिमाले; राष्ट्रवादीकडून सुहास टिंगरे

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीनाथ भिमाले; राष्ट्रवादीकडून सुहास टिंगरे

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीनाथ भिमाले यांनी तर राष्ट्रवादीकडून (अजित पवार) सुहास टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. टिंगरे यांनी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावर पीठासीन अधिकारी निर्णय घेणार आहेत.

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (दि. २३) सकाळी साडेअकरा वाजता पार पडणार आहे. त्यासाठी स्थायी समितीची विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून श्रीनाथ भिमाले यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सुहास टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पदासाठी अर्ज भरण्याची मुदत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत होती. सुहास टिंगरे यांनी दुपारी १ वाजून १ मिनिटांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य आहेत. त्यापैकी १२ सदस्य भाजपचे असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य आहे.

Web Title : स्थायी समिति अध्यक्ष पद के लिए भाजपा से भीमाले, राकांपा से टिंगरे

Web Summary : पुणे महानगरपालिका स्थायी समिति अध्यक्ष पद के लिए भाजपा से श्रीनाथ भीमाले और राकांपा से सुहास टिंगरे ने नामांकन दाखिल किया। टिंगरे का नामांकन देर से हुआ, समीक्षाधीन। चुनाव सोमवार को।

Web Title : BJP's Bhimale, NCP's Tingre Nominated for Standing Committee Chairperson Post

Web Summary : Srinath Bhimale (BJP) and Suhas Tingre (NCP) filed nominations for Pune Municipal Corporation's Standing Committee chairperson. Tingre's late filing is under review. Election scheduled Monday.