शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलावांत पुणेकरांच्या जिवाशी ‘खेळ’

By admin | Updated: April 8, 2015 03:49 IST

एकीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने; तसेच शाळांना सुट्या लागल्याने पुणेकरांचे पाय जलतरण तलावाकडे वळत आहेत. दुसरीकडे मात्र या जलतरण

पुणे : एकीकडे उन्हाचा कडाका वाढल्याने; तसेच शाळांना सुट्या लागल्याने पुणेकरांचे पाय जलतरण तलावाकडे वळत आहेत. दुसरीकडे मात्र या जलतरण तलावांमध्ये सुरक्षा नियमांची पायमल्ली केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेकडून शहरात चालविल्या जाणाऱ्या काही प्रमुख जलतरण तलावांची ‘टीम लोकमत’ने पाहणी केली असता, तलावांच्या ठिकाणी महापालिकेने घालून दिलेले नियम; तसेच सुरक्षा नियमावलीस हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. शहरात महापालिकेचे २१ तलाव असले, तरी त्याच्या कितीतरी अधिक पटीने खासगी सोसायट्या, हॉटेल्स; तसेच क्लबचे जलतरण तलाव आहेत. या तलावांच्या ठिकाणी सुरक्षा नियम पाळले जातात की नाही, याची तपासणी करणारी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. मागील वर्षी महापालिकेच्या; तसेच एका खासगी मालकीच्या जलतरण तलावात दोघांना प्राण गमवावे लागल्यानंतर पालिका प्रशासनाकडून शहरातील जलतरण तलावांचे सेफ्टी आॅडिट करण्यासाठी विशेष समिती नेमली होती. या समितीने महिनाभर शहर पिंजून काढले. सुमारे ३५० तलावांचे सर्वेक्षण केले. त्यात २२५ हून अधिक तलावांमध्ये सुरक्षा साधनांचा अभाव असल्याचा अहवाल समितीने दिला आहे. त्यातील ८० तलावांची सुरक्षाव्यवस्था बिकट असून, त्यांना तत्काळ सुधारणांसाठी नोटिसा बजाविल्या होत्या. तसेच, सुरक्षा साधनांची पूर्तता न केल्यास, तलाव सील करण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, पावसाळा सरताच या नोटीसचे पुढे काय झाले, याची माहितीही प्रशासनास नाही.