शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे दौऱ्यात मोंदीच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST

निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटला ...

निनाद देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटला ते भेट देणार असून कोरोना विषाणूवरील लसीची ते माहिती घेणार आहे. प्रंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे पोलीसांसह विशेष सुरक्षा दलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. पंतप्रधानांच्या प्रवासाठी नुकतेच बोईंग ७७७ ही दोन विमाने दाखल झाली असून त्यांचे नामकरण एअर इंडीया वन असे करण्यात आले आहे. या विषेश विमानाने पंतप्रधान मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे.

देशातील कोरोना विषाणूच्या लसीच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी हा दौंरा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या सोबत १०० देशांचे राजदूत असल्याने या दौऱ्याला मोठे महत्व आहे. दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान मोदी हे लोहगाव विमानतळ येथे येणार असून त्यानंतर ते हेलीकॅाप्टरने सीरममध्ये जाणार आहे. या काळात पुणे पोलीस आणि विशेष सुरक्षा बलावर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.

विशेष सुरक्षा बल(स्पेशल प्रोटेक्क्शन ग्रुप,एसपीजी):

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील मोठ्या पदावरील महत्वांच्या व्यक्तींसाठी विशेष सुरक्षा दलांची आवश्यकता जानवू लागली. त्यानंतर या बलाच्या स्स्थापनेची प्रक्रीया सुरू झाली. १८ फेब्रुवारी १९८५ ला केंद्रीय गृह मंत्रालयाने या साठी बिरबलनाथ समितीची स्स्थापना केली. या समितीने स्पेशल प्रोटेक्क्शन युनिटच्या स्स्थापनेचा प्रस्ताव दिला. ३० माचर्च १९८५ ला राष्ट्रपतींनी कॅबिनेट सचिवालयाला याची मान्यता देत या साठी ८१९ पदांच्या निमिर्तीला मंजुरी दिली. त्यानंतर २ जुन १९८८ ला भारतीय संसदेच्या एका अधिनयमानुसार स्पेशल प्रोटेक्क्शन ग्रुपची (एसपीजी) स्स्थापना झाली.

कुठल्याही प्रकारच्या हल्यापासून पंतप्रधानांची सुरक्षा करण्यास सक्षम

एसपीजीमध्ये असलेले स्पेशल कंमांडो हे पंतप्रधानांचे कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यापासून सक्षम असतात. त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण अतिशय कठीण असते. सवर्व प्रकारची आधुनिक हत्यारे, आधुनिक गाड्यांचा ताफा या बलांकडे असतो. आण्विक हल्यापासूनही बचावासाठीही या दलातील जवानांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. डायरेक्टर जनरल दर्जाचा आयपीएस अधीकारी या दलाचा प्रमुख असतो. त्याचे कार्यालय दिल्ली येथील पंतप्रधान निवास स्स्थानात आहे.

——

राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या प्रवासाठी आता एअर इंडीया वन

देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या देशातील तसेच परदेशाच्या प्रवासाठी बोईंग ७७७ ही दोन विमाने खरेदी करण्यात आली आहे. ही भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. अमेरीकेत राष्ट्रपतीच्या प्रवासाठी एअर फोर्स वन ही विमाने आहेत. सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा या विमानात आहे. त्याच धरतीवर एअर इंडीया वन या विमानात सुरक्षा यंत्रणा आहे. जवळपास ८ हजार ४०० करोड रूपये किमंतीची ही विमाने आहेत. या विमानाने मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे