Pune: भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पोटावरुन चाक गेल्याने तरुण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 11:46 IST2024-03-11T11:46:08+5:302024-03-11T11:46:44+5:30

खेड तालुक्यातील आंबेठाण येथे शुक्रवारी (दि. ८) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला....

Speeding vehicle collides with two-wheeler; A young man died after the wheel went off his stomach | Pune: भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पोटावरुन चाक गेल्याने तरुण ठार

Pune: भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; पोटावरुन चाक गेल्याने तरुण ठार

पिंपरी : भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. खेड तालुक्यातील आंबेठाण येथे शुक्रवारी (दि. ८) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

प्रशांत अण्णा इंगळे (३०, रा. गाजीपूर, टाकळी, गोरेगाव, जि. अकोला) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक विनायक संतोष गायकवाड (२०, रा. आसखेड, बुद्रुक, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत इंगळे हे खेड तालुक्यातील आंबेठाण येथून त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये प्रशांत हे रस्त्यावर पडले. त्यानंतर अज्ञात वाहनाचे चाक प्रशांत यांच्या कमरेवरून आणि पोटावरून गेले. यात ते गंभीर जखमी झाले. प्रशांत यांना जखमी अवस्थेत सोडून वाहनचालक पळून गेला. गंभीर जखमी झाल्याने प्रशांत यांचा मृत्यू झाला.

Web Title: Speeding vehicle collides with two-wheeler; A young man died after the wheel went off his stomach