शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनही होतेय मुख्य पीक

By admin | Updated: August 31, 2016 01:14 IST

गेले काही वर्षे पडत असलेल्या अनियमित पावसामुळे आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे खेड तालुक्यातील पीक पद्धत बदलली असून, भाताखालोखाल सोयाबीन हे खरिपाचे मुख्य पीक

राजेंद्र सांडभोर,  राजगुरूनरगेले काही वर्षे पडत असलेल्या अनियमित पावसामुळे आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे खेड तालुक्यातील पीक पद्धत बदलली असून, भाताखालोखाल सोयाबीन हे खरिपाचे मुख्य पीक होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत तब्बल २७५ टक्के सोयाबीनची लागवड तालुक्यात झाली आहे. तर खरीप बाजरी दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर या वर्षी अवघ्या १४ टक्के बाजरीच्या पेरण्या झाल्या आहेत. तसेच खरीप भुईमुगाचे क्षेत्रही वेगाने घटत असून या वर्षी ४३ टक्के भुईमूग पेरला गेला आहे. एकंदर खरिपाचे क्षेत्रच घटत चालले आहे. खेड तालुक्यात ५७००० हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे, असे सांगितले जाते. पण कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात खरिपाचे क्षेत्र ५७६०० हेक्टर आहे. परंतु २००९ साली ४१६८२ हेक्टर, २०१० साली ४०८३६ हेक्टर, २०११ साली ४२२०१ हेक्टर, २०१२ साली ३२०६२ हेक्टर, २०१३ साली ३७३०० हेक्टर, २०१४ साली २९५४५ हेक्टर, २०१५ साली ४२४६९ आणि या वर्षी ४०५३० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाल्याची कृषी खात्याची नोंद आहे. अलीकडच्या वर्षांमध्ये व्यावसायिक आणि औद्योगिक कारणांनी पिकांखालील क्षेत्र कमी होत चालल्याने मागील काही वर्षांचा आढावा घेऊन कृषी खात्याने खरीप क्षेत्राची सरासरी कमी केली असून, सध्या ४८६६७ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्चित केले आहे. त्यानुसार या वर्षी ८३ टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. एकंदर खरीप क्षेत्र घटण्याबरोबर बाजरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. तालुक्यात एकेकाळी सर्वांत जास्त बाजरी खरीप पीक म्हणून घेतले जाई. सुमारे ११ हजार हेक्टरवर बाजरी घेतली जाई. बाजरी २००९ साली १०५०० हेक्टर, २०१० साली ९३०० हेक्टर, २०११ साली ९१०० हेक्टर, २०१२ साली २०३५ हेक्टर, २०१३ साली २५४३ हेक्टर, २०१४ साली ८१७ हेक्टर, २०१५ साली १०७४ आणि या वर्षी अवघ्या ५८९ हेक्टरवर खरीप बाजरीचे पीक घेतले गेले. बाजरीचे हे क्षेत्र पाहता खरीप बाजरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.(वार्ताहर)