Suicide: पुण्यातील शिवसेना शहर उपप्रमुखाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 16:24 IST2021-11-16T16:23:32+5:302021-11-16T16:24:19+5:30
निखिल मालुसरे याने राहत्या घरी दुपारी १२ च्या सुमारास टेरेसवर गळफास घेऊन केली आत्महत्या केली

Suicide: पुण्यातील शिवसेना शहर उपप्रमुखाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : पुणे शहरातील शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निखील बाळासाहेब मालुसरे (28, रा. कमल स्मृती, गाडीखाना मागे, 1053 शुक्रवार पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल मालुसरे याने राहत्या घरी दुपारी १२ च्या सुमारास टेरेसवर गळफास घेऊन केली आत्महत्या केली. त्यानंतर तातडीने त्याला पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. बाळासाहेब मालुसरे यांनी कोव्हीड काळात अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. मध्यंतरी शुक्रवार पेठेत त्यांनी लसीकरण केंद्रही सुरु केले होते. त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने शहरात राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याचे कारणही कळू शकले नाहीये. या घटनेबाबत खडक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.