वडिलांवर गोळी घालत स्वतःवरही घेतली गोळी झाडून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 14:20 IST2020-03-29T14:18:44+5:302020-03-29T14:20:19+5:30
काैटुंबिक वादातून मुलाने वडिलांवर गाेळी झाडत स्वतःवर गाेळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडला आहे.

वडिलांवर गोळी घालत स्वतःवरही घेतली गोळी झाडून
बारामती : बारामती तालुक्यातील कोर्हाले गावात बारामती तालुका खरेदि विक्री संघाचे संचालक दिपक खोमने यांनी त्यांच्या वडिलांवर बंदुकीने गोळ्या झाडल्याची घटना रविवारी (दि 29) सकाळी 11 च्या सुमारास घडली .
धनवंतराव धोंडीबा खोम ने असे त्यांचे नाव आहे .या घटनेनंतर खोमने यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली .या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून हि घटना घडल्याची माहिती मिळत आहे. दोघांना घटनेनंतर उपचारासाठी बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले होते .उपचारापूर्वीच धनवंतराव यांचा म्रूत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .तर दिपक खोमने यांची प्रक्रुती गंभीर असून त्यांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात येत आहे .