नात्याला काळीमा फासणारी घटना; सासूवर जावयाने केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 11:53 IST2022-06-27T11:40:36+5:302022-06-27T11:53:23+5:30

३८ वर्षीय जावयावर गुन्हा दाखल...

son in law raped her mother-in-law incidents that tarnish relationships pune crime news | नात्याला काळीमा फासणारी घटना; सासूवर जावयाने केला बलात्कार

नात्याला काळीमा फासणारी घटना; सासूवर जावयाने केला बलात्कार

जुन्नर : सासू व जावयाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जुन्नर तालुक्यात घडली आहे. या संदर्भात ४६ वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारी नुसार जुन्नर पोलिसांनी ३८ वर्ष वयाच्या जावयावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी प्रमाणे तिच्या जावयाने तिच्या राहत्या घरी तसेच गावातील डोंगराच्या पायथ्याशी मे २०२१ व फेब्रुवारी २०२२ मध्ये वेळोवेळी बलात्कार केला. तसेच या प्रकारचे पीडित महिलेच्या नकळत चित्रीकरण केले.

यासंदर्भात कोणास काही वाच्यता केल्यास तुमच्या मुलीला सोडून देईल, तुमच्या मुलाला जीवे मारून टाकीन, तुमच्या मालमत्तेमध्ये मला वाटा द्या असे सांगत चित्रीकरण तसेच मोबाइल मधील संवाद समाज माध्यमावर टाकीन अशी धमकी जावई देत असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: son in law raped her mother-in-law incidents that tarnish relationships pune crime news