रांजणगाव गणपती : सोशल मीडियावर झळकलेल्या तिसऱ्या लग्नाच्या फोटोमुळे एका भीषण गुन्ह्याला वाचा फुटल्याची धक्कादायक घटना भांबार्डे (ता. शिरूर) परिसरात उघडकीस आली. स्वतःच्या ११ महिन्यांच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी आईला पोलिसांनीअटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भांबार्डे येथील रवींद्र अशोक पवार यांनी ५ एप्रिल रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांची पत्नी पूजा रवींद्र पवार (वय २२) ही ८ मार्च रोजी मुलगा यश (वय ११ महिने) याच्यासह घरातून निघून गेली होती. दरम्यान, ५ एप्रिल रोजी संबंधित महिला जांबुत गावच्या हद्दीत आढळून आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. सुरुवातीला तिने मुलगा अपघातात मृत झाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी सखोल व कौशल्यपूर्ण तपास करीत विश्वासात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले.
मुलगा सतत रडत असल्याने आणि पुढील आयुष्यात लग्न करताना अडथळा ठरू नये या विचारातून तिने स्वतःच्या मुलाचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बॅगमध्ये ठेवून विहिरीत टाकल्याचेही निष्पन्न झाले. या प्रकरणातील महत्त्वाचा धागा सोशल मीडियातून समोर आला. आरोपी महिलेचा तिसऱ्या लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामवर झळकल्यानंतर तो पती रवींद्र पवार यांच्या निदर्शनास आला. त्यांनी पत्नीशी संपर्क साधून मुलाबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संशय बळावला आणि त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्हा उघडकीस आणला. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, फॉरेन्सिक पथक व वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे यांनी भेट देऊन पुरावे गोळा केले.रवींद्र पवार यांच्या फिर्यादीवरून ६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पूजा पवार हिला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करीत आहेत.
Web Summary : A woman in Bhambarde killed her 11-month-old son fearing he'd impede her third marriage. She confessed after her husband saw her wedding photo online and inquired about the child. The body was found in a well.
Web Summary : भांबर्डे में एक महिला ने तीसरी शादी में बाधा बनने के डर से अपने 11 महीने के बेटे को मार डाला। पति ने शादी की तस्वीर ऑनलाइन देखने के बाद बच्चे के बारे में पूछा तो उसने कबूल कर लिया। शव कुएं में मिला।