शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प बंधनकारक करणार : शिवाजीराव कचरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 17:04 IST

सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प राबविणे बंधनकारक करणार आहे, असे प्रतिपादन सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले. सौर उर्जा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देलक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात २३ किलोवॅट सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटनभारतामध्ये १७५ गिगावॅट अपारंपरिक उर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट : किशोर शिंदे

पुणे : धार्मिक स्थळांमध्ये अशा प्रकारचा सौर उर्जा प्रकल्प उभारणे, ही स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण बाब आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर उर्जा वापरण्याचे आम्ही ठरविले आहे. दत्तमंदिराने केलेला सौर उर्जा प्रकल्प इतर संस्थांकरिता मार्गदर्शक असून या विभागातील सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प राबविणे बंधनकारक करणार आहे, असे प्रतिपादन सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले.कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिरात २३ किलोवॅट सौर उर्जा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास यावेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (मेडा) अध्यक्ष किशोर शिंदे, व्यवस्थापक विकास रोडे, महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा महामंडळ पुणेचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, कार्यकारी अभियंता किशोर गोर्डे, प्रणव शहा, नितीन शहा, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, बी. एम. गायकवाड, शिरीष मोहिते, चंद्रशेखर हलवाई, युवराज गाडवे, उल्हास कदम, अ‍ॅड. एन. डी.पाटील आदी उपस्थित होते. शिवाजीराव कचरे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा परिसरात सौर उर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकºयांची परिस्थिती वाईट आहे. तेथे सौर उर्जा शेती प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. किशोर शिंदे म्हणाले, भारतामध्ये १७५ गिगावॅट अपारंपरिक उर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ६० गेगावॅट वीजनिर्मिती आपण पूर्ण केली आहे. संपूर्ण उद्दिष्टापैकी तब्बल १०० गीगावॅट वीज सौरउर्जेच्या माध्यमातून आपण तयार करणार आहोत. सौर उर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात सौर उर्जेचा वापर व्हायला हवा.एम. जी. शिंदे म्हणाले, पुण्यामध्ये हा ७५वा सौर उर्जा प्रकल्प सुरु झाला आहे. पुणे विभागामध्ये १ हजार ५५१ किलोवॅट वीज निर्मिती होत अपारंपरिक उर्जा स्त्रोतातून होत असून प्रत्यक्षात १ हजार ५०० मेगावॅटची आवश्यकता आहे. अपारंपरिक उर्जा ही निसर्गावर अवलंबून असली, तरी क्लिन एनर्जी, ग्रीन एनर्जीकरीता याकडे वळायला हवे. महाराष्ट्राने २०२२पर्यंत १२ हजार मेगावॅट वीज तयार करण्याचे धोरण केले आहे. त्यापैकी ३ हजार ७८० मेगावॅट वीज सौर उर्जा, बायोगॅस आदींच्या माध्यमातून तयार झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास कदम यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणे