दगडूशेठ गणपतीची थ्री डी रांगोळी , भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:22 AM2017-08-28T01:22:23+5:302017-08-28T01:22:50+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवास १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून प्रसिद्ध रंगावलीकार प्रा. अक्षय शहापूरकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची थ्री डी रांगोळी साकारली आहे.

Dagaduheth Ganapati's 3 D Rangoli, the attraction of the devotees | दगडूशेठ गणपतीची थ्री डी रांगोळी , भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र

दगडूशेठ गणपतीची थ्री डी रांगोळी , भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र

googlenewsNext

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवास १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून प्रसिद्ध रंगावलीकार प्रा. अक्षय शहापूरकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची थ्री डी रांगोळी साकारली आहे. या प्रदर्शनातील दगडूशेठ हलवाई गणपतीची रांगोळी सर्व भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत असून, सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या रांगोळीस सलग १६ तास लागले असून, त्यास विशिष्ट पद्धतीचे रेखांकन आवश्यक असते. जर रेखांकन थ्री डी नसेल, तर पुढे
अशी थ्री डी रांगोळी साकारणे शक्य नाही. पुढे अशा प्रकारच्या थ्री डी रांगोळीस अधिक मागणी प्रेक्षकांकडून होणार आहे. तरी त्यासाठी कार्यशाळा घेऊन अधिक विद्यार्थी घडवणार असल्याचेही अक्षय शहापूरकर यांनी सांगितले.
आजवर रांगोळी म्हटले की, फक्त पारंपरिक रांगोळी, व्यक्तिचित्र रांगोळी यापुरता मर्यादित न राहता, त्याही पलीकडे अजून बरेच प्रकार त्यांनी कलाप्रेमींसाठी साकारण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे .

Web Title: Dagaduheth Ganapati's 3 D Rangoli, the attraction of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.