९ पाणी पुरवठा योजना लवकरच सौर उर्जा पंपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 08:05 PM2017-08-03T20:05:15+5:302017-08-03T20:06:42+5:30

कारंजा: वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ९ पाणी पुरवठा योजना या लवकरच सौर उर्जा पंपावर चालविण्यात येणार आहेत. कारंजा-मानोराचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी याबाबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर उर्जामंत्र्यांनी यावर कार्यवाहीसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना लेखी सूचना केल्या आहेत. 

9 Water Supply Scheme Soon on Solar Power Pumps | ९ पाणी पुरवठा योजना लवकरच सौर उर्जा पंपावर

९ पाणी पुरवठा योजना लवकरच सौर उर्जा पंपावर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्पप्रकल्प मार्गी लावण्यासाठी आमदार राजेंद्र पाटणी यांचा पुढाकारउर्जामंत्री बावनकुळे यांनी प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी दिल्या लेखी सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा: वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ९ पाणी पुरवठा योजना या लवकरच सौर उर्जा पंपावर चालविण्यात येणार आहेत. कारंजा-मानोराचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी याबाबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर उर्जामंत्र्यांनी यावर कार्यवाहीसाठी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना लेखी सूचना केल्या आहेत. 
वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ९ पाणी पुरवठा योजना या सौर उर्जा पंपाद्वारे सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. वाशिम मार्फ त विभागीय महाव्यवस्थापक, अमरावती यांच्याकडे पाठविला होता. या ९ पाणी पुरवठा योजना अतिशय महत्त्वाच्या असल्याची बाब कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर उर्जामंत्री बावणकुळे यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना या संदर्भात लेखी सूचना केल्या आहेत.  वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मानोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, कारंजा तालुक्यातील भामदेवी पाणी पुरवठा योजना, मालेगाव तालुक्यातील जऊळका प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, चांडस प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, दुबळवेल प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील  प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, रिसोड तालुक्यातील करडा  प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, तसेच चिचांबाभर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, वाशिम तालुक्यातील वारला प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आदि योजनांचा यामध्ये समावेश आहे. 

Web Title: 9 Water Supply Scheme Soon on Solar Power Pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.