शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

समाजाकडे स्वतंत्रतेची प्रेरणा नाही : गजानन खातू

By admin | Updated: May 9, 2017 03:57 IST

गांधी, फुले, आंबेडकर यांच्या नावांचा वापर करण्याखेरीज समाजाला स्वतंत्र काही करण्याची प्रेरणा होत नाही. पूर्वीचे विचार हा ठेवा आहेच;

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गांधी, फुले, आंबेडकर यांच्या नावांचा वापर करण्याखेरीज समाजाला स्वतंत्र काही करण्याची प्रेरणा होत नाही. पूर्वीचे विचार हा ठेवा आहेच; समाज बदललेला नाही. प्रस्थापित व्यवस्थेला तोंड द्यायला नवे विचार आणि नवीन धारणा निर्माण करता आल्या नाहीत. गतिमान आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये काही घटक बाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ विचारवंत गजानन खातू यांनी व्यक्त केली.आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त सईद मिर्झालिखित आणि मिलिंद चंपानेरकर अनुवादित ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ या साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारप्राप्त कादंबरीतील काही भागांचे अभिवाचन गजानन परांजपे, वंदना बोकील-कुलकर्णी आणि अमित वझे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्रुती तांबे, पुरोगामी कार्यकर्ते संजय मं. गो. आणि कवी गणेश विसपुते उपस्थित होते.सईद मिर्झा यांची ही कलाकृती म्हणजे अस्सल धर्मनिरपेक्ष साहित्य आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे पुस्तक मराठीमध्ये येणे गरजेचे होते. धर्मनिरपेक्षतेचा अभाव असल्याने आपण खूप काही सहन करत आहोत आणि आणखी काही सहन करण्याची चिन्हे दिसत असल्याचे मिलिंद चंपानेरकर यांनी सांगितले. अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कराळे यांनी आभार मानले.