शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

...म्हणून बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी: खासदार अमोल कोल्हेंनी घेतली पशुसंवर्धन मंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 5:08 PM

संरक्षित प्राण्यांच्या यादीतून 'बैल' हा प्राणी वगळावा, अशीही मागणी केली.

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविताना डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याबाबत शब्द दिला होता. त्याच दृष्टीने बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी या हेतूने आत्तापर्यंत कोल्हे प्रयत्न करताना दिसत आहे. खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचवण्यासाठी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून 'बैल' हा प्राणी वगळावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली. 

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी बुधवारी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. बैलगाडा शर्यती बंद झाल्यापासून सातत्याने खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या कमी होत असून १९९७ पासून २०१८ पर्यंत जवळपास बैलांची संख्या २२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर २०१९ ही संख्या २९.६३ इतकी कमी झाली असून सोळावी पशुगणना ते १९ वी पशुगणना या काळात ४५.६७ टक्क्यांनी बैलांची संख्या कमी झाली असल्याकडे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांचे लक्ष वेधले. वाघ, सिंह, अस्वल, माकड या संरक्षित जंगली प्राण्यांच्या यादीत पाळीव प्राणी असलेल्या 'बैल' प्राण्याचा समावेश झाल्यामुळे देशी खिलार जातीच्या बैलांचा वंश नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी निदर्शनास आणताच गिरीराज सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याचे सांगण्यात आल्याने आपण निर्णय घेतला नाही, अशी कबुली दिली.

'बैल' प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी आपण मांडलेले मुद्दे श्री. गिरीराज सिंह यांनी आपुलकीने समजून घेतले. त्याचबरोबर बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला असून बारा बलुतेदारांचा व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापार पूर्णतः थांबला आहे. याकडे आपण गिरिराज सिंह यांच्याकडे लक्ष वेधल्याचे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याबाबत गिरीराज सिंह यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून गुरुवारी ही बैठक होण्याची शक्यता असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले. या भेटीत श्री. गिरीराज सिंह यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना डॉ. कोल्हे यांनी केलेल्या आक्रमक व मुद्देसूद भाषणाचं कौतुक केले.

बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतील समावेश वगळण्याबद्दल काल मान. गिरीराज सिंहजी यांना निवेदन दिले होते. त्यासंदर्भात संबंधित खात्याचे Joint Secretary ओ. पी. चौधरी यांच्यासोबत गुरुवारी मंत्रिमंहोदयांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्याच्या दृष्टीने सर्वोपतरी सहकार्य करण्याची मंत्री महोदयांची भूमिका पाहून समाधान वाटले.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेBull Cart Raceबैलगाडी शर्यत