शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांमध्ये ‘लय भारी गेम शो’ची धूम

By admin | Updated: October 10, 2016 02:35 IST

‘लय भारी गेम शो’मध्ये सहभागी होत सखी आपल्या सुप्त गुणांचे प्रकटीकरण करून धमाल आणताहेत. शहरातील सोसायट्यांमध्ये या गेम

पिंपरी : ‘लय भारी गेम शो’मध्ये सहभागी होत सखी आपल्या सुप्त गुणांचे प्रकटीकरण करून धमाल आणताहेत. शहरातील सोसायट्यांमध्ये या गेम शोची धूम सध्या पाहायला मिळत आहे.लोकमत सखी मंच, कात्रज दूध यांच्या वतीने व नक्षत्र सिल्क अ‍ॅन्ड सारीज यांच्या सहकार्याने महिलांसाठी ठिकठिकाणी आज ‘लय भारी गेम शो’ आयोजित करण्यात येत आहे. आनंदाचे पर्व घेऊन येणारा नवरात्रोत्सव, विविध मनोरंजक स्पर्धा, जिंकण्याची चढाओढ, उत्साही नागरिकांचा जल्लोष, हास्यविनोद करणारे सूत्रसंचालक, बक्षिसांची रेलचेल, संगीतमय वातावरण यांनी परिपूर्ण असलेला हा गेम शो फुलेनगर व कृष्णानगर येथे घेण्यात आला.गणपती बाप्पा मोरया, दुर्गामाता की जय व माता माता की जय म्हणत स्त्री शक्तीला अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिलांच्या अप्रतिम उखाण्यांनी कार्यक्रमात रंग भरण्यास सुरुवात झाली. महिलांसाठी तळ्यात मळ्यात, नंबर खेळ, रस्सीखेच, बॉल बकेटमध्ये आदी मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या. जोडींसाठी केसात स्ट्रॉ माळणे, फुगा फोडणे व पत्नीसाठी विटांचा रस्ता तयार करणे आदी स्पर्धांही घेण्यात आल्या. स्पर्धांमधून महिलांची खिलाडूवृत्ती दिसून आली. सासू-सुनेच्या जोड्यांच्या रॅम्पवॉकने उपस्थितांचे मन जिंकून घेतले. कार्यक्रमादरम्यान नक्षत्र सिल्क अ‍ॅन्ड सारीज व मॅक्स वस्त्रदालन यांच्यामार्फत महिलांना कुपन देण्यात आले. प्रज्ञा फडके, अनघा बंडगे, मेघा उमककार व साक्षी म्हस्के या चांदीचे नाण्याच्या विजेत्या ठरल्या. रिटा सानप व वर्षा सानप यांचे विशेष सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)