शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’वरून भाजपावर हल्लाबोल

By admin | Updated: August 7, 2015 00:29 IST

राज्य शासनाने स्मार्ट सिटीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा संयुक्त प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करून पुणेकरांवर अन्याय तसेच त्यांचा अपमान केला आहे.

पुणे : राज्य शासनाने स्मार्ट सिटीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचा संयुक्त प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करून पुणेकरांवर अन्याय तसेच त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे आधी आयआयएम, नंतर मेट्रो नागपूरला पळविणाऱ्या सरकारने आता स्मार्ट सिटी योजनेतही पुणेकरांना दुजाभावाची वागणूक दिल्याचा आरोप महापालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपा सरकारवर करून हल्लाबोल केला.गुरुवारी झालेल्या मुख्यसभेत नगरसेवक दिलीप बराटे यांनी या संदर्भातील चर्चा सर्वसाधारण सभेत उपस्थित करताना जेएनएनयुआरएम योजनेपाठोपाठ एलबीटी बंद करून राज्य शासनाने महापालिकेचा आर्थिक कणा मोडला, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराला निधी मिळण्याची शक्यता होती, परंतु दोन्ही महापालिकांचा संयुक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवून ती देखील हिरवण्यात आली. पुणे शहराला सर्वच प्रकारच्या विकासापासून वंचित ठेवण्याचा डाव राज्य शासन खेळत असल्याचा आरोप करत त्यांनी निषेध नोंदविला. विरोधी पक्षेनेते अरविंद शिंदे यांनी राज्य शासनाने पुण्याचा मान ठेऊ नये, परंतु, वारंवार अपमानित तरी करू नये. पुणे शहरातून राज्याला २५ टक्के उत्पन्न मिळते. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जेमतेम १०० कोटी रुपये देऊन तोंडाला पानेतरी पुसू नये, अशी टीकाही त्यांनी केली. अ‍ॅड. अभय छाजेड यांनी जेएनएनयुआरएमच्या माध्यमातून शहरात अनेक प्रकल्प झाले. शहरातील प्रकल्प नियोजनाची दखल केंद्र आणि राज्य शासनानेही घेतली आहे. स्मार्ट सिटी योजना केंद्र शासनाची असताना राज्याचे सचिव प्रवीणसिंह परदेशी दोन्ही शहरांना ५०० कोटी रुपये देण्याची घोषणा करतात, ही शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप छाजेड यांनी केला, तर स्मार्ट सिटीमध्ये राष्ट्रवादीला शह देण्यासाठी राजकारण केले जात असून, भाजपा-राष्ट्रवादीच्या वादात पुणेकरांचा बळी देऊ नये, अशी टीका मनसेचे गटनेते बाबू वागसकर यांनी केली. तर मेट्रो, आयआयएमबाबत पुण्यावर अन्याय करणाऱ्या राज्य शासनाने स्मार्ट सिटीमध्येही तीच री ओढली आहे.