शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

जीवरक्षकांकडून केली जातात किरकोळ कामे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 1:00 PM

फायरमनदेखील शेवटी माणूसच

ठळक मुद्दे व्यथा अन् कथा संकटकाळी धावून येणाऱ्या ‘फायरमनची’

युगंधर ताजणे- पुणे : जीवितहानी असो वा वित्तहानी, अशा प्रकारच्या कुठल्याही परिस्थितीत सर्वात प्रथम मदतीला धावून येतो तो फायरमन. मागील काही वर्षांपासून या फायरमनला गृहीत धरण्याचे प्रकार दिसू लागले आहेत. यामुळेच की काय नागरिकांना आता फायरमनचे कार्य, त्याची भूमिका आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी या सगळ्यांची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांपूर्वी सांगवीतील अपघातात प्राण गमवाव्या लागलेल्या फायरमनच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. अग्निशमन दलाच्या एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतला माहिती देताना सांगितले, की गेल्या अनेक वर्षांपासून फायरमनची पदे रिक्त आहेत. त्याकडे कुणाचे लक्ष नाही. पूर्वी पुण्यासारख्या मुख्यालयात किमान ३५ ते ४0 माणसे काम करीत होती. आता ती संख्या केवळ दहापेक्षा कमी आहे. अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. एकीकडे सगळी क्षेत्रे डिजिटल स्वरूपात विकसित होत असताना दुसरीकडे त्याचा फायदा अग्निशमन दलाला कशा पद्धतीने होईल यावर विचार होणे गरजेचे आहे. यासंबंधात वरिष्ठांचे मार्गदर्शन हवे. येत्या काळात भरतीची प्रक्रिया पार पडल्यास परिस्थितीत सुधारणा होईल असे वाटते. नागरिकांनी दरवेळी कुठलेही कारण का असेना त्याची अगोदर पाहणी करूनच अग्निशमच्या दलाला माहिती द्यावी. अनेकदा नागरिक विनाकारण घरगुती कारणे, तसेच इतर नागरिकांच्या सहकार्यातून गंभीर परिस्थिती निवळणार असेल तर नागरिकांचे सहकार्य घेणे गरजेचे आहे.  .......कशासाठीही फोन...रस्त्याचे काम सुरु असताना खराब झाल्यास तो धुऊन देण्याची मागणी नागरिक करतात. अशा वेळी त्यांना केवळ आपत्कालीन परिस्थितीत तसेच रस्त्यावर झालेला अपघात, त्यामुळे रस्त्यावर सांडलेले रक्त तो भाग स्वच्छ करण्याकरिता पोलिसांकडून सांगण्यात आल्यास प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेची कार्यवाही केली जाते. घराला लावलेल्या कुलूपाची चावी हरवल्यास ते कुलूप तोडून देण्यासाठी अग्निशमन दलाला फोन केला जातो. इतकेच नव्हे तर चावीवाल्याकडून जास्त पैशांची मागणी करण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रारी देण्यास नागरिक मागेपुढे पाहत नाहीत. इमारतीच्या एखाद्या भागात मधमाश्यांचे पोळे असल्यास ते काढून देण्याकरिता अनेक कॉल कंट्रोलला येतात. ते काम आमचे नाही असे संबंधिताला सांगितल्यास त्यावर त्याचे आमच्याविषयीचे मत वाईट  होते. आता मधमाश्यांचे पोळे काढून देण्याचे कामदेखील फायरब्रिगेडने करायचे का? हा मुख्य प्रश्न आहे. ......घटनास्थळी अनेकांची फोटो घेण्याची झुंबड उडालेली असते. काही जण अपघातस्थळाचे चित्रीकरण करून लगेच त्यासंबंधीची पोस्ट व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर शेयर करतात. त्यात बºयाचदा चुकीची माहिती टाकून नागरिकांची दिशाभूल करतात. ज्याला खरोखर मदतीची गरज असते अशा व्यक्तीला मदत करायची सोडून बहुतांश जणांची सेल्फीकरिता गर्दी जमलेली असते.- सुजित पाटील, स्टेशन आॅफिसर, पीएमआरडीए........फायरमनला नेहमीच जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करावा लागतो. दोन दिवसांपूर्वी सांगवी येथे घडलेल्या घटनेबाबत बोलायचे झाल्यास तिथे नागरिकांनी जरा सहकार्याची भूमिका दाखवणे गरजेचे होते. अनेकदा अपघातस्थळी लोकांचा हलगर्जीपणा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यांनी केलेल्या गडबडीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. अशा वेळी तातडीने उपाययोजना करून बचावकार्य क रावे लागते. फायरमन आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतो. त्याकरिता त्याला परिसरातील नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. घटनास्थळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना अनेकदा शिस्तीचा धाक दाखवावा लागतो. ते नागरिकांच्या भल्यासाठीच असते, हे त्यांनी लक्षात घ्यावे. - प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलAccidentअपघातfireआग