शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

हडपसरमधील मदरशातून सहा मुले बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 9:55 PM

मुले मैदानावर खेळत असताना शौचालयात जाण्याच्या बहाण्याने मदरशातून बाहेर पडली होती. मात्र, ती अद्याप मदरशात किंवा घरी परतली नाहीत.

ठळक मुद्देसर्व मुले शिक्षणासाठी तीन जुलै रोजी मदरशामध्ये दाखल एकाच ठिकाणाहून सहा मुले बेपत्ता झाल्याचे समजताच पोलिसांनीही त्यांचा कसून शोध

पुणे : हडपसर परिसरातील मदरशातून सहा मुले बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही मुले मैदानावर खेळत असताना शौचालयात जाण्याच्या बहाण्याने मदरशातून बाहेर पडली होती. मात्र, ती अद्याप मदरशात किंवा घरी परतली नाहीत. तीन जुलैपासून हे सर्व बेपत्ता आहेत.      सहमद आसार उद्दीन रजा (वय १३), अन्ना महंमद आजाद शेख (वय १२), अहसान निजाम शेख (वय १५), शाहनवाज जमालुउद्दीन शेख (वय १६), अन्वारुल इसराइल हक (वय १३) आणि रिजवान आलग सलमुद्दीन शेख (वय १५) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी मोहम्मद अबु तालीब शब्बीर आलम शेख (वय २६) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर येथील दारुल उलूम चिस्तीया जलालिया नावाच्या मदरशामध्ये ही मुले दाखल झाली होते. फिर्यादींंनी मदरशात आधीपासून असलेल्या तीन मुलांसोबत त्यांना ३ जुलै रोजी सायंकाळी जवळच्या मैदानात खेळायला नेले होते. टप्प्या-टप्याने ही सर्व मुले शौचालयात जायचे असल्याचे सांगून बाहेर पडली. यानंतर ती मदरशामध्ये गेली, तेथून स्वत:चे सामान घेऊन कोणालाही काही न सांगता निघुन गेली आहेत. यानंतर ती मदरशात तसेच घरी परत आली नाहीत. त्यांच्या कुटूंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केल्यानतर प्रत्येक कुटुंबाने वानवडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. एकाच ठिकाणाहून सहा मुले बेपत्ता झाल्याचे समजताच पोलिसांनीही त्यांचा कसून शोध घेत आहेत. तर मुले घरी न परतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी टाहो  फोडला आहे. बेपत्ता झालेल्या मुलांनी कोणीतरी आमिष दाखवत पळवून नेल्याची शक्यता आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. शिंदे तपास करत आहेत.........................सर्व मुले बिहारचे सर्व मुलांना नातेवाईकांनी शिक्षणासाठी तीन जुलै रोजी मदरशामध्ये सोडले होते. सकाळी ती मदरशात दाखल झाल्यावर सायंकाळी मदरसा सोडून गेली. सर्व मुले मुळचे बिहारचे आहेत. ते त्यांच्या मुळ गावी देखील पोहचली नसल्याचे नातेवाईकांकडून कळले आहे, असे तपास अधिकारी शिंदे यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसHadapsarहडपसरMuslimमुस्लीमBiharबिहार