शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या प्रियकराचा पुण्यात खून; पळून गेलेल्या भावासह दोघांना नांदेड येथून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:33 IST

बहिणीचे प्रेमसंबंध भावाला मान्य नसल्याने त्याने भररस्त्यात प्रियकराचा खून केला होता

पुणे: बहिणीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने तिच्या प्रियकराचा खून करून नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे पळून गेलेल्या दोघांना पुणेपोलिसांनी पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले आहे.  संदीप रंगराव भुरके ( वय -28 वर्ष रा भोकर जि नांदेड)  आणि ओमकार गणेशराव किरकन (वय 24 वर्ष रा भोकर जि नांदेड) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही आता पुण्याच्या दिशेने आणले जात आहे. जावेद खाजामियां पठाण (वय ३४, सध्या रा. नऱ्हेगाव, मूळ रा. मुदखेड रोड, ख्वाजा नगर, शनी मंदिराजवळ, भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

यातील आरोपी संदीप भुरके याची बहीण आणि मयत जावेद यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी होते. दोघांची घरे एकमेकांच्या शेजारी असल्याने अनेक वर्षाची ओळख होती आणि त्यातूनच प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र हे प्रेमसंबंध तरुणीचा भाऊ संदीप भुरके याला मान्य नव्हते. यातच जावेद याने प्रेयसीला पळवून पुण्यात आणले आणि नऱ्हे परिसरात एकत्र राहू लागले.

बहिण मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग संदीप भुरकेच्या मनात खदखदत होता. बहिण पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप भुरके एका साथीदारासह पुण्यात आला. जावेद ज्या ठिकाणी राहत होता, त्या ठिकाणी जाऊन त्याने जावेदशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संदीपने धारदार शस्त्राने जावेदवर वार केले. डोक्यावर आणि इतर ठिकाणी गंभीर जखमी झाल्याने जावेद जागीच कोसळला. त्यानंतर आरोपी पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत जावेदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ससून रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

इकडे पळून गेलेल्या आरोपींच्या शोधासाठी आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी एक टीम स्थापन केली होती. परिसरातील CCTV आणि तांत्रिक तपास करत आरोपीचा माग काढला. दोघेही नांदेड जिल्ह्यातील मूळ गावी गेल्याची माहिती समोर आली. आणि त्यानंतर आंबेगाव पोलिसांच्या तपास पथकाने दोघांनीही शिताफीने ताब्यात घेतले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Brother kills sister's lover; two arrested in Nanded

Web Summary : A Pune man was murdered by his girlfriend's brother for their relationship. The brother and an accomplice fled to Nanded but were apprehended by Pune police. The victim was attacked with a sharp weapon following an argument.
टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूNandedनांदेडDhankawadiधनकवडीArrestअटक