हृदयद्रावक घटना : भावासमोर बहिणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 20:47 IST2019-05-08T20:45:35+5:302019-05-08T20:47:39+5:30
शिरूर येथील नगर पुणे रस्त्यावर प्रतीक्षा चव्हाण या तरुणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. मात्र तिच्यासोबत त्यावेळी तिचा भाऊ होता. त्यामुळे भावासमोर बहिणीचा मृत्यू झाल्याने उपस्थितांच्या हृदयात कालवाकालव झाली.

हृदयद्रावक घटना : भावासमोर बहिणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
पुणे : शिरूर येथील नगर पुणे रस्त्यावर प्रतीक्षा चव्हाण या तरुणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. मात्र तिच्यासोबत त्यावेळी तिचा भाऊ होता. त्यामुळे भावासमोर बहिणीचा मृत्यू झाल्याने उपस्थितांच्या हृदयात कालवाकालव झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की,प्रतीक्षा ही शिरूरजवळील कल्याणी फाटा येथून कंपनीमध्ये कामाकरिता निघाली होती. त्यावेळी अचानक विरुद्ध दिशेने एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो भरधाव वेगाने आला आणि तिला टेम्पोची धडक बसली. आणि ती रस्त्यावर फेकली गेली. यावेळी काही अंतरावर उभा असलेला भाऊ स्वप्नील हा धावत तिच्या जवळ आला असता टेम्पोचे चाक प्रतीक्षाच्या डोक्यावरून गेल्याचे निदर्शनास आले. या अपघातात तिचा जागेवर मृत्यू झाल्याचा मोठा धक्का स्वप्नीलला बसला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे हे करत आहे.