मामाच करीत होता १५ वर्षांच्या भाचीचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 15:41 IST2020-02-08T15:37:33+5:302020-02-08T15:41:09+5:30

शाळेतील समुपदेशकामुळे  प्रकार आला उघडकीस

sister of brother was sexually exploiting a 15 year old girl | मामाच करीत होता १५ वर्षांच्या भाचीचे लैंगिक शोषण

मामाच करीत होता १५ वर्षांच्या भाचीचे लैंगिक शोषण

ठळक मुद्देकाहीशा डिप्रेशनमुळे १५ वर्षाची मुलगी घरी येण्यास तयार नसे  वानवडी पोलिसांनी मामाला केली अटक

पुणे : शनिवार रविवार घरी असल्यानंतर तो भाचीला धमकावत असे. तुझी शाळा बंद करेल, घराबाहेर फिरणे बंद करेल, असे धमकावुन तो तिच्यावर अत्याचार करीत असे. त्यामुळे ही १५ वर्षाची मुलगी घरी येण्यास तयार नसे. काहीशी डिप्रेशनमध्ये गेली होती. तिच्या मैत्रिणीला तिची ही अवस्था लक्षात आल्यावर तिने या मुलीला खोदून खोदून विचारले. तेव्हा आपला मामा करीत असल्याचे अत्याचाराची माहिती तिने मैत्रिणीला दिली. या मैत्रिणीने शाळेतील समुपदेशकांना हे सांगितले. त्यांनीही गंभीरपणे ही गोष्ट घेऊन या मुलीला विश्वासात घेतले. तिच्याकडून सर्व माहिती काढून घेतली. त्यानंतर ते या मुलीला थेट वानवडी पोलीस ठाण्यात घेऊन आला. वानवडीपोलिसांनी या मुलीच्या मामाला अटक केली आहे. 
याप्रकरणी १५ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार गेल्या आॅगस्ट २०१९ पासून सुरु होता. वानवडी पोलिसांनी पोस्को तसेच बलात्काराच्या कलमाखाली मामावर गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, हांडेवाडी येथील ही मुलगी शिकण्यासाठी होस्टेलवर राहते. शनिवार, रविवारी घरी येते. ३१ वर्षाचा तिचा मामा हा उत्तर प्रदेशातील मुळचा राहणारा असून तो या मुलीच्या घराजवळच राहतो. ही मुलगी घरी आल्यावर त्याने तिच्याशी गोड गोड बोलून तिच्याशी गप्पा मारत असे. त्यानंतर त्याने तिला तुझी शाळा बंद करील़ घरातून बाहेर फिरणे बंद करील. खेळणे बंद करेल, अशा धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिच्याशी शारीरिक संबंध करण्यास सुरुवात केली. त्याच्या धमकीमुळे तिने ही बाब कोणाला सांगितली नाही. संधी मिळेल, तेव्हा तो तिच्यावर जबरदस्ती करु लागला. त्यामुळे शनिवारजवळ आला की ही मुलगी डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. हे होस्टेलमधील तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आले. तिने विचारल्यावर आपल्यावर मामा करीत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. तिने शाळेतील समुपदेशकाला ही बाब सांगितली. त्यांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर या मुलीने मामाचे सर्व कृष्ण कृत्ये सांगितली. वानवडी पोलिसांनी मामाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक अभिजित जोगदंड अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: sister of brother was sexually exploiting a 15 year old girl